ETV Bharat / state

व्हॉट्सअॅपवरुन फोटो का डिलीट केले म्हणून १५ जणांकडून तरुणाला बेदम मारहाण

राहुलच्या वाढदिवसानिमित्ताने नितीन शेलारने कोपरगाव शहरातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर राहुलच्या वाढदिवसाचे फोटो पाठवले आणि काही वेळात पुन्हा डिलीट केले होते.

author img

By

Published : May 16, 2019, 4:20 PM IST

जखमी नितीन शेलार

अहमदनगर - व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन फोटो डिलीट केल्याने १५ जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कोपरगाव येथे घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास चालू आहे.

शहरातील राहुल शिरसाटचा १० मे रोजी वाढदिवस होता. राहुलच्या वाढदिवसानिमित्ताने नितीन शेलारने कोपरगाव शहरातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर राहुलच्या वाढदिवसाचे फोटो पाठवले आणि काही वेळात पुन्हा डिलीट केले. याचा राग आल्याने राहुल चंद्रहास शिरसाट याने लोखंडी गजाने नितीन शेलारच्या पाठीवर, पायावर वार करुन जखमी केले. तसेच, कैलास सिताराम सोमासे, अक्षय भालेराव, सुनील बाबुराव मोकळ, रवी वावळ, राहुल खंडीझोड, संतोष होतीस आणि इतर अनोळखी ४ ते ५ तरुणांनी नितीनला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

जखमी नितीनला उपचारासाठी शिर्डीतील श्री साईबाबा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. नितीन शेलार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील १५ जणांवर रजिस्टर नंबर १६०/२०१९ भा.द.वि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपक बोरसे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ वाढदिवसाचे फोटो व्हाट्सअप ग्रुप वरून डिलीट केल्याने 15 जणांकडून एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना कोपरगाव शहरात घडलीय..कोपरगाव पोलीस स्टेशनला 15 जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहे....

VO_ कोपरगाव शहरातील राहुल शिरसाट याचा गेल्या 10 मे रोजी वाढदिवस होता राहुलचा वाढदिवसा निमित्ताने नितीन शेलार या तरुणाने कोपरगाव शहरातील एका व्हाट्सअप ग्रुप राहुलच्या वाढदिवसाचे फोटो पाठवले आणि काही वेळात पुन्हा डिलीट केल्याचा राग येऊन राहुल चंद्रहास शिरसाट याने हातातील लोखंडी गजाने नितीन शेलार यांच्या पाठीवर पायाच्या नडगीवर वार करून जखमी केले..तसेच कैलास सिताराम सोमासे अक्षय भालेराव सुनील बाबुराव मोकळ रवी वावळ राहुल खंडीझोड संतोष होतीस यासह इतर अनोळखी चार-पाच तरुणांनी नितीन शेलार या तरुणाला या सर्वांनी मिळून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे..जखमी नितीन शेलारला या तरुणाला उपचारासाठी शिर्डीतील श्री साईबाबा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे....नितीन शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील १५ जणांवर रजिस्टर नंबर 160 / 2019 भादवि कलम 143, 147, 148, 149, 326, 323, 504, 506, 34 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.दीपक बोरसे हे करीत आहे....Body:16 May Shirdi Whatsapp Photo Delete On HittingConclusion:16 May Shirdi Whatsapp Photo Delete On Hitting
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.