अहमदनगर (शिर्डी) - फॅशन शो म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कॅटवॉक. मांजरीची चालायची लकब ही अतिशय डौलदार असल्यानं तिच्यासारख चालता येण्याची कसब लागते. असा फॅशनचा जलवा आपण नेहमीच बघतो. मात्र, शिर्डीतील साई आश्रया अनाथालयातील मुलींचा असा कॅटवॉक आपण कधीच पाहिला नसेल. जुन्या कापड्यांपासून केलेली ही नवीन फॅशन आणि त्यातच अनाथालयातील मुलींची रॅम्पवर चालण्याची लकब यानं अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे.
मुलींनी उपस्थितीतांची जिंकली मने -
कोपरगाव येथे समता फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 2021 गोदावरी महोत्सवात शिर्डीतील साई आश्रया अनाथालयातील मुलींनी हा कॅटवॉक सादर केला आहे. शिर्डी शहरातील तसेच परिसरातील नागरिकांना साई आश्रया अनाथालयातील मुलांना दिलेल्या जुन्या कपड्यापासून अनाथालयातील रिना जाधव या महिलेने जुन्या कपड्यांचे शिवणकाम करून नवीन वस्त्रे बनावली आहेत. ही वस्त्रे अनाथालयातील मुलींनी परिधान करून चक्क रॅम्पवर कॅटवॉक केला आहे. लयबद्ध संगीत आणि त्यावर अगदी प्रोफेशनल मॉडलप्रमाणे चाल यामुळे या मुलींनी उपस्थितीतांची मने जिंकली आहे.
मनात जिद्द असेल तर अवघ्या आभाळाला गवसणी घालण्याची ताकत आपल्यात येते. असेच धडे शिर्डीतील साई आश्रया या अनाथालयात दिले जातात. येथे येणारी मुलं आई-वडिलांच्या मायेला पोरकी झालेली असतात. अशा मुलांना समाजात ताट मानेन जगण्याचे धाडस आणि उच्चशिक्षीत होऊन स्वतःच्या पायावर उभ राहत आपलं अस्तित्व निर्माण करण म्हणजे शेकडो जनसमुदाय समोरील हा कॅटवॉक म्हणलं तर वावग ठरणार नाही.
हेही वाचा - जळगावात 'भारत बंद' संमिश्र प्रतिसाद; काँग्रेस-राष्ट्रवादीने सक्तीने केली दुकाने बंद