ETV Bharat / state

पिंपळदरीच्या येडूबाई देवीची यात्रा उत्साहात

अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे येडूबाईची देवीची यात्रा भरली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी भील्ल समाजबांधवानी देवीचे दर्शन घेत देवीला नवस केले.

पिंपळदरीच्या येडूबाई देवीची यात्रा उत्साहात
author img

By

Published : Apr 21, 2019, 8:41 PM IST

अहमदानगर - अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे येडूबाईची देवीची यात्रा भरली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी भील्ल समाजबांधवानी देवीचे दर्शन घेत देवीला नवस केले. येथे देवीचा नवस फेडण्यासाठी कोंबड्या आणि बकऱ्यांचा मोठया प्रमाणात बळी दिला जातो. महाराष्ट्रातील भील्ल समाजाचा हा एकमेव उत्सव असून एकमेकांचे सुख दुख, संवाद, लग्नकार्य, न्यायनिवाडा भील्ल बांधव याच ठिकाणी करतात.

पिंपळदरीच्या येडूबाई देवीची यात्रा उत्साहात

अकोल्यापासून ३२ किलोमीटरवर असणाऱ्या पिंपळदरी गावात गडावर येडूबाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराची दर चैत्र पोर्णिमेच्या दुसऱया दिवशी यात्रा भरते. ३ दिवस चालणाऱ्या या उत्सवास पहाटे ४ वाजता मांडे कुटुंबीयांच्या हस्ते देवीला अभिषेक करून सुरुवात होते. या ठिकाणी ३ दिवस भील्ल समाज देवीच्या ओव्या व गाणी म्हणतात. त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होते.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाची कुलदेवता असलेल्या‘येडूबाई देवी’च्या जत्रेत लाखो भिल्ल समाज बांधव भाविकांनी दर्शन घेत नवसपूर्ती केलीये....

VO_ अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे येडु आईची यात्रा भरते या वेळी भिल्ल समाज्यातील भाविकनवस पुर्ती म्हणुन कोंबड्या आणि बकरांचा मोठया प्रमाणात बळी देतात. आहुती देवीचा जयजयकार करत अंगावर असूड मारत, कापूर जाळत, लोटांगण घेत भिल्ल समाजाने गडावर जाऊन एकच जल्लोष केला. महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचा हा एकमेव उत्सव असून एकमेकांचे सुख दुखं, सवांद, लग्न कार्य, न्यायनिवाडा यासाठी भिल्ल बांधव आपला मुक्काम वाढवतात यात्रेचे वैशिष्टे म्हणजे एकमेकांना जगायला बळ आणि उर्जा मिळते भिल्ल समाजाचे आराध्यदैवत असल्याने वर्षभरात इथल्या जत्रेला हजेरी लावली नाही असा भिल्ल बांधव विरळच लाखोंच्यावर गर्दी इतकीच गर्दी इथे पाहायला मिळते एरवी शांत,निवांत अंधाराच्या कुशीत पहुडलेले मुळा खोरे यात्रेच्या निमित्ताने चार सहा दिवस सारखे जागते राहते. महाराष्ट्र व बाहेरील राज्यातून लोक इथे येतात....

BITE_ रंगनाथ एकनाथ आहेर, भक्त

VO_ अकोले तालुक्यातील पिपंळ दरीच्या येडूबाई गडाचा परिसर, महाराष्ट्र भरातून हजारोच्या संख्येनी जमलेले भिल्ल बांधव त्यांच्या शेतांमध्ये पडलेल्या राहुट्या जागा मिळावी म्हणून ३ दिवस अगोदरच आलेले त्यांचे सर्व कुटुंब जत्रेत नवस पुरतीसाठी गडाच्या खाली असलेल्या "वाघाई व गाडीवान" या देवतासमान असणाऱ्या मंदिरासमोर दिड हजारपेक्षा अधिक मुलांनीमार्फत (मुस्लिम समाजाचे लोक) बकरांची देण्यात आलेली आहुती, निघालेली पारंपारिक वाद्य डफ, हलगीच्या निनादात व तालावर म्हटली जाणारी पारंपारिक देवीची महती सागणारे खड्या आवाजात म्हटली जाणारी पारंपारिक गवने "हजारोच्या संख्येने निघालेल्या काठ्या, व त्यासोबत देवीचा गडावर चालवलेला नैवैध्य, त्याच वेळी ४० एकरपरिसरात तीन दगडावर पेटवलेल्या चुली त्यावर शिजणारे मटन हे दृश्य म्हणजे भिल्ल समाजाची येडूबाई विषयी असलेली श्रद्धा त्याला बळीची असणारी काळी किनार असे दृश्य पाहायला मिळाले....

BITE_ सोपान मोरे भक्त

VO_ अकोल्यापासून ३२ किलोमीटर वर असणारे पिपंऴदरी गाव तिथे गडावर येडूबाई चे १८५० पासूनचे सर्वे नंबर ५८ मध्ये मंदिर आहे . या मंदिराची दर चैत्र पोर्णिमे च्या दुसर्या दिवशी येथे जत्रा व यात्रा भरते तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवास पहाटे ४ वाजता मांडे कुटुंबियांच्या हस्ते देवीला अभिषेक करून होते. मुकुट ,चोळी , पातळ व अलंकार मांडव डहाळ्या आणि पारंपारिक वाद्याच्या गजरात गडावर जाऊन देवीला पोशाख नेसविला जातो.गडावर धावत जाने आदी परंपरा भिल्ल समाज जपतो तर मुलाचा नवस असेल तर यावेळी नवसपूर्ती करण्यात येते तीन दिवस भिल्ल समाज देवीच्या ओव्या व गीते म्हणतात त्यामुळे भक्तिमय वातावरण तयार होते....Body:21 April Shirdi Akole Yedubai YatraConclusion:21 April Shirdi Akole Yedubai Yatra
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.