अहमदनगर - प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येऊनही लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर फिरणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी पोलिसांचे प्रमाण कमी असल्याने आता पोलिसांच्या मदतीला ग्रामीण भागातील तलाठी आणि ग्रामसेविक देखील रस्त्यावर उतरले आहेत. शिर्डीत तर महिला तलाठी आणि महिला ग्रामसेविकांनी लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना चक्क उठबशा काढायला लावल्या.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात
शिर्डीतील तलाठी देवकर आणि ग्रामसेविका आवटे यांनी जे कोणी नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसेल आणि त्यांनी मास्क लावलेले नसेल, तर त्यांना जागेवरच शिक्षा म्हणून उठाबशा काढायला लावत आहेत. त्यामुळे आता विनाकारण घराबाहेर पडणे लोकांना चांगलेच महागात पडत आहे.