ETV Bharat / state

leopard attack in Sangamner taluka : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; संगमनेर तालुक्यातील घटना

तालुक्यातील मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे बिबट्याने हल्ला केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हिराबाई एकनाथ बढे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी (21 फेब्रुवारी)रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; संगमनेर तालुक्यातील घटना

author img

By

Published : Feb 22, 2022, 12:29 PM IST

अहमदनगर (संगमनेर) - तालुक्यातील मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे बिबट्याने हल्ला केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हिराबाई एकनाथ बढे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. (Woman killed in leopard attack in Sangamner taluka) सोमवारी (21 फेब्रुवारी)रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले

संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे राहत असलेल्या हिराबाई बढे या रात्री घराबाहेर निघाल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करीत अक्षरशा त्यांच्या नरडीचा घोट घेतला. (leopard attack in Sangamner taluka) त्यांच्या गळ्याला बिबट्याच्या दातांच्या खोलवर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.

या घटनेने मेंढवण परिसरावर शोककळा पसरली आहे

घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सागर माळी, वनपाल प्रशांत पुंड, वनरक्षक संतोष पारधी, एस. बी. सोनवणे सहित वन कर्मचाऱ्यांनी प्रथम घटनास्थळी व तेथून लोणी येथे धाव घेतली. बिबट्याने हल्ला केल्याने हिराबाई बढे यांच्या गळ्यावर खोलवर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची वनपाल प्रशांत पुंड यांनी सांगितले. या घटनेने मेंढवण परिसरावर शोककळा पसरली आहे. महिलेचा बळी घेणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी मच्छिन्द्र बढे व विनायक काळे यांनी केली आहे.

हेही वाचा - Disha Salian Murder Case : दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंचे ट्विट, म्हणाले 'ती काळी मर्सिडीज....'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.