ETV Bharat / state

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप - harassment by in-laws

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली. पूजा मयूर नाईक (वय 20) असे या विवाहितेचे नाव आहे. पूजाच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला आहे.

याच कांद्याच्या चाळीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली
author img

By

Published : Aug 30, 2019, 6:01 PM IST

अहमदनगर - सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली. पूजा मयूर नाईक (वय 20) असे या विवाहितेचे नाव आहे. पूजा यांनी ब्राह्मणगाव येथील राहत्या घरी कांद्याच्या चाळीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोपरगाव तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
ही घटना आज (शुक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पूजाच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला आहे. त्यामुळे विवाहितेची आत्महत्या की हत्या? हे गूढ कायम आहे. दरम्यान या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत पूजा हिचा विवाह मयूर उर्फ गणेश नाईक याच्यासोबत 17 महिन्यांपूर्वी झाला होता. त्यांना एक 6 महिन्यांचा मुलगा देखील आहे. पूजाचा वेळोवेळी सासरकडून मानसिक छळ केला जात होता, असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पूजाचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका माहेरच्या मंडळींनी घेतली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_सासरच्या छळाला कंटाळून पूजा मयूर नाईक 20 वर्षीय या विवाहितेने कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील राहत्या घरी कांद्याच्या चाळी मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली आहे.... याबाबत पूजाच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला आहे. आत्महत्या की हत्या? हे गूढ कायम असले तरी पोलिस तपासानंतर हे सर्व निष्पन्न होणार आहे..दरम्यान या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे....

VO_ याबाबत अधिक माहिती अशी की मयत पूजा हिचा विवाह मयूर उर्फ गणेश नाईक त्याच्यासोबत 17 महिन्यांपूर्वी झाला होता, पूजाला एक 6 महिन्याचा मुलगा देखील आहे, पुजाला वेळोवेळी सासरकडून मानसिक छळ केला जात होता असा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे, जोपर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मयत पूजाचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका माहेरच्या मंडळींनी घेतली आहे...

BITE_मायतीची काकू

VO_दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पि आय प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेहास शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले अधिक उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते अधिक तपास पोलीस करत आहे....Body:mh_ahm_shirdi_death_30_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_death_30_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.