ETV Bharat / state

अहमदनगर शहर : मुळा धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी राखीव; १५ जुलैपर्यंत अडचण नाही - धरण

येत्या १५ जुलैपर्यंत नगर शहरासह इतर सर्व पाणी पुरवठा योजनांना नियमित पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुळा धरणाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे.

मुळा धरण
author img

By

Published : May 27, 2019, 5:03 PM IST

अहमदनगर- शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात ५ हजार ३५० दलघफु इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्य स्थितीत उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. येत्या १५ जुलैपर्यंत नगर शहरासह इतर सर्व पाणी पुरवठा योजनांना नियमित पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुळा धरणाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे.

मुळा धरण

अहमदनगर महानगरपालिकेचे विद्युत आणि पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम यांनी सांगितले की, मुळा धरणात पाण्याची पातळी ही १,७५६.४५ फूट इतकी असून १,७५२ फूट पातळी असेपर्यंत पाणी पुरवठ्या बाबत कुठलीही अडचण नसते. आतापर्यंत ३० जूनच्या आतच नवीन पाण्याची आवक धरणात आल्याने शहराला पाणी पुरवठ्याची अडचण यंदाही येणार नसल्याची आशा निकम यांनी व्यक्त केली आहे.

पाणी काटकसरीने वापरा- मनपा

शहराला रोज २.५ दलघफु इतके पाणी उपलब्ध केले जाते. महानगरपालिका हद्दीत जवळपास ५२ हजार पाणी नळजोडणी दिलेली आहे. दोन साठवण टाक्यांमधून पुढे इतर सतरा टाक्यांच्या माध्यमातून सर्व नळजोड दिलेले आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि १० जून नंतर मान्सूनच्या उशिराच्या आगमनाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन मनपाच्या वतीने परिमल निकम यांनी केले आहे.

Intro:अहमदनगर- मुळा धरणात 15 जुलै पर्यंत पुरेल इतका पाणी साठा.. धरणालते पाणी फक्त पिण्यासाठी राखीव..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_drinking_water_reserved_2019_vij1_7204297

अहमदनगर- मुळा धरणात 15 जुलै पर्यंत पुरेल इतका पाणी साठा.. धरणालते पाणी फक्त पिण्यासाठी राखीव..

अहमदनगर- अहमदनगर शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात आज मितीला पाच हजार तीनशे पन्नास (5,350) दलघफु इतका पाणी साठा उपलब्ध असून हा पाणी साठी फक्त पिण्या साठी राखीव ठेवण्यात आला आहे. उपलब्द पाण्या नुसार येत्या 15 जुलै पर्यंत नगर शहरासह इतर सर्व पाणी पुरवठा योजनांना नियमित पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुळा धरणाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे विद्युत आणि पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम यांनी सांगितले की, मुळा धरणात पाण्याची पातळी ही 1,756.45 फूट इतकी असून 1,752 फूट पातळी असे पर्यन्त कुठलीही अडचण पाणी पुरवठ्या बाबत नसते. जिल्हा प्रशासनाने धरणातील उपलब्ध पाणी साठा आता फक्त पिण्यासाठी राखीव ठेवला असल्याने शहराला सध्या सुरू असलेल्या प्रमाणे नियमित पाणी पुरवठा 15 जुलै पर्यन्त करता येणार आहे. आता पर्यंत 30 जूनच्या आतच नवीन पाण्याची आवक धरणात होत आलेली असल्याने शहराला पाणी पुरवठ्याची अडचण यंदाही येणार नसल्याची आशा व्यक्त केली आहे.

पाणी काटकसरीने वापरा- मनपा-
-शहराला रोज 2.5 दलघफु इतके पाणी उपलब्ध केले जाते. महानगरपालिका हद्दीत जवळपास 52 हजार पाणी नळजोड दिलेले असून दोन साठवण टाक्यां मधून पुढे इतर सतरा टाक्यांच्या माध्यमातून सर्व नळजोड दिलेले आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिती आणि 10 जून नंतर मान्सूनचे उशिराच्या आगमनाचा अंदाज हवामान खात्याने वर्तीवला असल्याने नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे असे आवाहन मनपाच्या वतीने परिमल निकम यांनी केले आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- मुळा धरणात 15 जुलै पर्यंत पुरेल इतका पाणी साठा.. धरणालते पाणी फक्त पिण्यासाठी राखीव..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.