ETV Bharat / state

Ahmednagar Gram Panchayat Election : नगरमधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान; जाणून घ्या, सविस्तर लेखाजोखा - अहमदनगर ग्रामपंचायत निवडणूक

Ahmednagar Gram Panchayat Elections: अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराने गावागावांत राजकीय धुरळा उडाला. (Gram Panchayat Election Campaign) शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार थांबला असून रविवारी 5 नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 1 हजार 697 सदस्यपदासाठी आणि 175 ठिकाणी सरपंचपदासाठी मतदान होणार आहे. (Voting for Sarpanch Post)

Ahmednagar Gram Panchayat Elections
निवडणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 7:24 PM IST

Updated : Nov 4, 2023, 8:06 PM IST

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा थांबला

अहमदनगर Ahmednagar Gram Panchayat Elections: दक्षिण जिल्ह्यात एकूण 722 ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहेत तर 16 सदस्य पद जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. थेट सरपंच पदासाठी एकाही ठिकाणी पोटनिवडणूक होणार नाही. अहमदनगर दक्षिणेतील ग्रामपंचायत निवडणूक ही नगर पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा या 7 तालुक्यात पार पडणार आहे.

कोण कोणाविरुद्ध लढणार? नगर तालुक्यात शरद पवार गटाचे आमदार प्राजक्ता तनपुरे विरुद्ध भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले विरुद्ध लढत होईल. यामध्ये कर्डीले विरोधात महाविकास आघाडी पहायला मिळू शकेल. पारनेर तालुक्यात अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके विरुद्ध दोन ग्रामपंचायत त्यामधील एक कम्युनिस्ट दुसरी भाजप समर्थक विरोधात आहे. पाथर्डी शेवगाव हे दोन तालुके असले तरी पाथर्डी शेवगाव मतदारसंघ एकच असल्याने पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगाव मधून अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले तर पाथर्डी करंजी या ठिकाणाहून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे विरोधात आहेत. कर्जत जामखेड हे दोन तालुके असून मतदार संघ एक आहे. त्यामुळे या ठिकाणी आमदार असलेले शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार विरुद्ध भाजपाचे विधान परिषदेचे राम शिंदे यांच्यात समीकरण पहायला मिळणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात भाजपाचे आमदार असलेले बबनराव पाचपुते यांच्या विरोधात शरद पवार गटाचे राहुल जगताप व काँग्रेसचे राजेंद्र नागवडे यांच्यात रंगतदार समीकरण पहायला मिळणार.

तालुक्यात राजकीय समीकरणं काय आहेत? नगर तालुक्यामध्ये शरद पवार गटाच्या स्टँडिंग आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्यासह महाविकास आघाडी विरुद्ध भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आहेत. पारनेर तालुक्यात अजित पवार गटाचे स्टॅंडिंग आमदार निलेश लंके विरुद्ध एका ग्रामपंचायत भाजप समर्थक तर दुसऱ्या ग्रामपंचायत मध्ये कम्युनिस्ट पार्टी आहे.
पाथर्डी तालुक्यात भाजपाचे स्टँडिंग आमदार मोनिका राजळे विरुद्ध शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार प्रतापराव ढाकणे व शरद पवार गटाचे स्टॅंडिंग आमदार प्राजक्त तनपुरे लढणार आहेत. शेवगाव तालुक्यात भाजपाचे स्टँडिंग आमदार मोनिका राजळे विरुद्ध शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आहेत. कर्जत तालुक्यात शरद पवार गटाचे स्टँडिंग आमदार रोहित पवार विरुद्ध भाजपाचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्यात लढत आहे. जामखेड तालुक्यात शरद पवार गटाचे स्टॅंडिंग आमदार रोहित पवार विरुद्ध भाजपाचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे असा सामना रंगणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात भाजपाचे स्टँडिंग आमदार बबनराव पाचपुते विरुद्ध शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप व काँग्रेसचे राजेंद्र नागवडे यांच्यात लढत पहायला मिळेल.

ग्रामपंचायतीत सध्या कुणाची सत्ता? नगर तालुक्यात भाजपची सत्ता आहे तर पारनेरमध्ये अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके, पाथर्डीत भाजपाचे स्टँडिंग आमदार मोनिका राजळे यांचा सत्ता आहे. शेवगावमध्ये शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, जामखेड आणि कर्जतमध्ये भाजपाचे विधान परिषद आमदार राम शिंदे यांची सत्ता आहे तर श्रीगोंद्यात शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांचे सत्ता वर्चस्व आहे.

काय आहे उत्तर अहमदनगरचे चित्र? उत्तर अहमदनगर जिल्ह्यात 72 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. एकूण 882 ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहेत. तर 87 सरपंच पद जागांसाठी निवडणूक होणार आहे. उत्तर जिल्ह्यात थेट सरपंचपदासाठी एकाही ठिकाणी पोटनिवडणूक होणार नाही. उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील निवडणूक ही कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, संगमनेर आणि अकोले या 7 तालुक्यात पार पडणार आहे.

आमदार कोण आहे? त्यांचा प्रतिस्पर्धी कोण आहे? कोपरगाव तालुक्यात पारंपरिक राजकीय विरोधक आमदार आशुतोष काळे (राष्ट्रवादी) आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे (भाजपा) यांच्यातच निवडणूक होतेय. राहुरी तालुक्यात शरद पवार गटाचे आमदार प्राजक्ता तनपुरे विरुद्ध भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, राधाकृष्ण विखे अशीच लढत होईल. श्रीरामपूर तालुक्यात कॉंग्रेसचे दोन गट, राष्ट्रवादी दोन गट आणि बीआरएस तसेच भाजपा यांच्यात लढत होईल. संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात लढत होणार आहे. अकोले तालुक्यात माजी आमदार वैभव पिचड विरुध्द राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार किरण लहामटे अणि शरद पवार गटाचे भांगरे यांच्यात लढत पहायला मिळेल. नेवासा तालुक्यात भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विद्यमान आमदार शंकराव गडाख, दिवंगत माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटात लढत पाहायला मिळेल. राहाता तालुक्यात राधाकृष्ण विखे भाजप विरोधात कोल्हे, थोरात अशी लढत असेल.

तालुक्यात राजकीय समीकरणं काय आहेत? कोपरगावमध्ये पारंपरिक काळे, कोल्हे घराण्यात लढाई होतेय. राज्याच्या सत्तेत भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे बरोबर सहभागी असले तरी कोपरगाव तालुक्यात मात्र या दोघांमध्ये विळ्या भोपळ्याच नात बघावयास मिळतय. राहाता तालुक्यात भाजपाचे राधाकृष्ण विखे विरोधात विरोधक अशीच स्थिती आहे. त्यात कोल्हे विरुध्द विखे गट प्रमुख लढत असून काही ठिकाणी तर विखेंना मानणारेच गट एकमेकांविरुद्ध लढताहेत. संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे गटात निवडणूक होताना दिसतायेत. अकोले तालुक्यात भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्यातच प्रमुख लढत अशीच होणार आहे. काही ठिकाणी पिचडांचे दोन गट एकमेकां विरोधात लढताहेत.
श्रीरामपूर तालुक्यात कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि बीआरएस यांच्यात काही ठिकाणी एकमेकांना विरोधात तर काही ठिकाणी एक एक गट बरोबर घेऊन निवडणुका होतायेत. श्रीरामपूर तालुक्यात प्रामुख्याने कॉंग्रेसचे ससाणे, कानडे गट विरुध्द भाजपा आणि राष्ट्रवादीतून बीआरएस मध्ये गेलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे अशीच लढाई आहे. राहुरी तालुक्यात प्रामुख्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे विरुध्द माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यातच लढत होतेय. नेवासा तालुक्यात माजी मंत्री शंकरराव गडाख विरुद्ध भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याच लढत होत आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत गडाखांच्या दोन गटात निवडणूक होतेय.

ग्रामपंचायतीत सध्या कुणाची सत्ता?
कोपरगाव तालुका काळे, कोल्हे गटाची सत्ता आहे. राहाता तालुका राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर तालुका कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस, अकोले तालुका माजी आमदार वैभव पिचड (भाजप) यांची सत्ता आहे. यासह नेवासा तालुक्यात शंकराव गडाख गट तर राहुरी तालुक्यात प्राजक्त तनपुरे गटाची सत्ता आहे.

हेही वाचा:

  1. Mumbai University Election Program : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं वेळापत्रक जाहिर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
  2. Voters Number Increased : राज्यातील मतदारांची संख्या पाच लाखांनी वाढली
  3. Bawankule On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेलं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप...

Last Updated : Nov 4, 2023, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.