ETV Bharat / state

कोपरगावमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन, दोन हॉटेल 7 दिवसांसाठी सील

author img

By

Published : Mar 29, 2021, 3:07 PM IST

रात्रीच्या वेळी संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोपरगाव शहरातील दोन हॉटेलवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे. हे दोनही हॉटेल पुढील 7 दिवसांसाठी सील करण्यात आले आहेत.

कोपरगावमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन
कोपरगावमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन

अहमदनगर - रात्रीच्या वेळी संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोपरगाव शहरातील दोन हॉटेलवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे. हे दोनही हॉटेल पुढील 7 दिवसांसाठी सील करण्यात आले आहेत.

जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण हे झपाट्याने वाढत असून, कोपरगाव शहारासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपार पोहोचली आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाकडून कडक सूचना करत निर्बंध लावण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन हॉटेल बियर बारवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील सात दिवसांसाठी हे हॉटेल सील करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापने ही रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी आहे. मात्र तरी देखील जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.

दोन हॉटेल 7 दिवसांसाठी सील

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

दरम्यान जे दुकानदार, व्यवसायीक कोरोना नियमांचे पालन करणार नाहीत, जे आपल्या हॉटेल, दुकांमधील गर्दीवर नियंत्रण ठेवणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. रात्री 8 नंतर हॉटेल बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आला होत्या. मात्र तरी देखील काही हॉटेल चालकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने, कोपरगावमधील दोन हॉटेल रविवारी रात्री प्रशासनाने सात दिवसांसाठी सील केले आहेत. दरम्यान व्यवसायिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा - राज्यात कोरोना स्थिती गंभीर.. लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.