रुद्रप्रयाग (उत्तराखंड ) : मान्सूनच्या पावसाने डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. ताजं प्रकरण केदारनाथ यात्रेचा मुख्य थांबा असलेल्या मुंकटिया येथील आहे. जिथे डोंगराच्या माथ्यावरून पडलेल्या ढिगाऱ्याने अचानक एका वाहनाचा अपघात ( Accident in rudraprayag ) झाला. या अपघातात वाहनातील 10 जण जखमी झाले, तर एका महिलेचा जागीच मृत्यू ( One killed and three injured ) झाला. माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
पोलीस आणि आपत्ती नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 3.50 वाजता केदारनाथ महामार्गावरील मुंकटियाजवळील डोंगरावरून अचानक दगड पडले. एका प्रवासी वाहनाला त्याची धडक बसली. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले, तर गाडीतील महिला प्रवासी पुष्पा मोहन भोसले ( वय 62, रा. काष्टी, जिल्हा अहमदनगर) यांचा मृत्यू झाला. तर अन्य दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार महाराष्ट्रातील अहमदनगर, तीन बिहारमधील पाटणा, एक स्थानिक रहिवासी आणि दोन नेपाळमधील आहेत. जखमींमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
जखमी प्रवाशांची यादी-
कृष्णा भाले (वय १२, रा. अहमदनगर महाराष्ट्र)
ज्योती बाळासाहेब काळे (वय ४०, रा.अहमदनगर महाराष्ट्र)
कल्पना रंगनाथ काळे (वय 59, रा.कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र)
राम साळुंके (वय ३८, रा. गोंडा, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र)
गौतम कुमार (वय २४, रा. पाटणा, बिहार)
शिवकुमार (वय २१, रा. पाटणा, बिहार)
अंकित शर्मा (वय २१, रा. बिहार)
पलामन (वय ३०, रा. नेपाळ)
टिकाराम (वय ३२, रा. नेपाळ)
रमेशसिंग सिंग (वय ३६, रा. बदासू रुद्रप्रयाग)
हेही वाचा : केदारनाथ यात्रेत 175 घोड्यांसह खेचरं मारले गेले; मालकांना 56 कोटींची कमाई