ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये विनापरवाना सॅनिटायझर बनवणारा अटकेत

author img

By

Published : May 9, 2021, 9:01 PM IST

अहमदनगरमध्ये विनापरवाना सॅनिटायझर बनवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विकास गुलाब तिखे असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 2 लाख 18 हजार रुपयांचे सॅनिटायझर बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गंभीर बाब म्हणजे सॅनिटायझर बनवण्याची कोणतीही तांत्रिक माहिती नसतानाही तो हा धंदा करत होता.

ahmednagar
अहमदनगर

अहमदनगर - विनापरवाना आणि अवैधपणे सॅनिटायझर बनवणाऱ्या एका व्यक्तीला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 18 हजार रुपयांचे सॅनिटायझर बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमी मिळाली, की विकास गुलाब तिखे (रा. दत्त चौक, काष्टी) हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या हँड सॅनिटायझर तयार करून त्याची विक्री मेडिकल, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी करत आहे. यानंतर ढिकले यांनी अन्न व औषध प्रशासन विभागास सूचना केल्या. त्यानुसार औषध निरीक्षकांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काष्टी ते तांदळी रोडवर शिक्षक कॉलनीजवळ छापा मारला.

कसलेही तांत्रिक ज्ञान नसताना सॅनिटायझरची निर्मिती

एका पत्र्याच्या शेडमध्ये विकास गुलाब तिखे (वय 28) हा त्याच्याकडील ड्रम मधील द्रव्याच्या मदतीने निळे डाय (रंग) पाणी व इतर केमिकल मिक्स करून सॅनिटायझर तयार करताना आढळून आला. त्याल सॅनिटायझर बनवण्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते. तरीही तो सॅनिटायझर बनवत होता.

पोलिसांनी छापा मारल्यानंतर आरोपीकडे सॅनिटायझर बनवण्याचे साहित्य आढळले. त्यात 200 लिटरचे सहा बॅरल, 35 लिटरचे 20 कॅन, 5 लिटरचे 109 कॅन, चंचुपात्र, नरसाळे, गाळणी, प्रत्येकी 10 बॉटलचे 3 मोठे बॉक्स ज्यामध्ये कलर डाय असलेल्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या सुगंधी 4 बाटल्या, 50 मिलीच्या 25 स्प्रे बाटल्या, स्टिकर, बिलबुक असे एकूण 2 लाख 18 हजार रुपये किमतीचे सॅनिटायझर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व साधन सामग्री मिळून आली. अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अशोक राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला ड्रग अँड कॉस्मेटिक अ‍ॅक्ट या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर करत आहेत.

हेही वाचा - शाब्बास! पक्षांसह, गोरगरिबांना मदतीचा हात; सत्यपूर युवा मोर्चाचा पुढाकार

हेही वाचा - आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिले तसेच बहुजनांचे सुद्धा पालकत्व स्वीकारा - गोपीचंद पडळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.