अहमदनगर- शिर्डीतील श्री साईबाबा रुग्णालयाजवळील नगर पंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात एका तरुणाची हत्या झाली आहे. दगडाने ठेचून निर्घृणपणे ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे.
श्री साईबाबा रुग्णालयाजवळ नगर पंचायतीचे सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. दगडाने ठेचून ही हत्या झाली असून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याचा अंदाज आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटली नाही. मात्र, तरुण शिर्डीत भिक्षा मागणारा किंवा नाक्यावर काम करणारा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलीस अधीक्षक अखलेश सिंग तसेच पोलीस उप अधीक्षक दिपाली काळे घटनास्थळी दाखल झाला आहेत. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.