ETV Bharat / state

अशा भानगडी होत असतील तर या सरकारला लवकरच जावं लागेल... - ramdas athawale shirdi news

मसुरीला आयएएस, आयपीएस ट्रेनिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले असताना त्यांना विमानातून बाहेर काढले. विमानात काही खराबी असेल तर अगोदरच राज्यपालांना कल्पना देणे गरजेचे होते. मात्र, असे न करता राज्यपालांना विमानातून उतरवून दिले.

ramdas athawale
रामदास आठवले
author img

By

Published : Feb 14, 2021, 2:49 PM IST

Updated : Feb 14, 2021, 3:04 PM IST

अहमदनगर - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आज (रविवारी) शिर्डीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींवरुन त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, राज्यातील आघाडी सरकारमध्ये अशा भानगडी होत असतील तर सरकारला लवकर जावे लागेल आणि देवेंद्र फडवणीस यांना लवकर यावे लागेल, असा टोला आठवले यांनी आपल्या कवितेतून लगावला. आठवले दोन दिवस अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिर्डीत घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीतील पत्रकार परिषदेत बोलताना.

महानगरपालिकेबाबत भाजपसोबत चर्चा सुरू -

यावेळी आठवले म्हणाले, मसुरीला आयएएस, आयपीएस ट्रेनिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले असताना त्यांना विमानातून बाहेर काढले. विमानात काही खराबी असेल तर अगोदरच राज्यपालांना कल्पना देणे गरजेचे होते. मात्र, असे न करता राज्यपालांना विमानातून उतरवून दिले. विमान सरकारची संपत्ती नसुन हे विमान जर राज्यपालांना वापरता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनीही हे विमान वापरू नये, अशी टीकाही त्यांनी केली. येत्या काही दिवसांवर राज्यातील महानगरपालिकाची निवडणूक येत आहे. आम्ही भाजपबरोबर राहूनच राज्यातील महानगरपालिकांची निवडणूक लढवणार असुन या संदर्भात राज्यातील भाजप नेत्यांना बरोबर चर्चा सुरू असल्याचे आठवले म्हणाले.

हेही वाचा - अभिनेता सचिन जोशीची ईडीने केली चौकशी

येत्या 25 फेब्रुवारीला देशभरात रिपब्लिकन पक्षाच्यावतीने भुमीहिन यांना पाच एकर जमीन द्यावी, यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. जर पाच एकर जमीन भुमिहिनांना देण्याचा निर्णय घेण्यात आला तर देशातील गरिबी हटवण्यात मोठी मदत होणार आहे. खेड्या भागातून शहरात येणाऱ्या लोकांचे संख्या कमी होईल आणि खेड्या गावातील विकास होणार आहे. आज देशामध्ये सरकारची 20 कोटी एकर व्हॅकांड जमिनी आहे. ही जमिन जर सरकारने वाटली तर अनेक गरीब लोकांना याचा फायदा होणार असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच राज्यातील सरकार कुठलाही पक्षाचे असो हे आंदोलन कुठल्याही पक्षाविरोधात नसुन हे आंदोलन देशाच्या विकासासाठी आणि देशातील गरिबी हटवण्यासाठी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Feb 14, 2021, 3:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.