ETV Bharat / state

Ujwal Nikam In Shirdi : राज ठाकरेंवर देशद्रोह किंवा राजद्रोहचा गुन्हा सिध्द होणार नाही, उज्वल निकम यांचे मत - उज्वल निकम राज ठाकरे राजद्रोह प्रतिक्रिया

राज ठाकरेंना ( Raj Thackeray ) विरोधातही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पीआएल दाखल करण्यात आली आहे. यांसंदर्भातील त्यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांनी पीआयएल दाखल केली आहे, त्यात काय आरोप केले मला माहिती नाही. मात्र, मी माध्यमांमध्ये बघितले. त्यावरून राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध होणार नाही, असे जेष्ठ वकील उज्वल निकम ( Ujwal Nikam On Raj Thackeray Sedition ) म्हणाले.

Ujwal Nikam In Shirdi
Ujwal Nikam In Shirdi
author img

By

Published : May 7, 2022, 7:23 PM IST

Updated : May 7, 2022, 10:07 PM IST

अहमदनगर - जेष्ठ वकील उज्वल निकम ( Ujwal Nikam In Shirdi ) यांनी आज सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. राणा दाम्पत्याविरोधात दाखल राजद्रोहाचा ( Sedition On Rana Couple ) गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांनी टीका केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर मी बोलणं योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच राज ठाकरेंना ( Raj Thackeray ) विरोधातही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पीआएल दाखल करण्यात आली आहे. यांसंदर्भातील त्यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांनी पीआयएल दाखल केली आहे, त्यात काय आरोप केले मला माहिती नाही. मात्र, मी माध्यमांमध्ये बघितले. त्यावरून राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध होणार नाही, असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया

'आपल्याला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे' - राज्यातील राजकीय परस्थीतीवर बोलताना निकम यांनी राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. यामुळे लोकांनी डोके शांत ठेवले पाहिजे. महाराष्ट्र आपल्या पुढे घेऊन जायचा आहे. मुख्यमंत्र्यांचादेखील तो प्रयत्न आहे. विरोधीपक्ष देखील त्यांचा हाकेला साथ देतील, अशी अपेक्षा आहे. जिथे चांगले काम कारायची आहेत तिथे सर्वांची एकी असली पाहिजे असल्याची भावना वक्त केली आहे.

'राजद्रोह आणि देशद्रोह हे शब्द प्रयोग एकच' - इंग्रजांच्या काळात इंग्लंडचा राजा अथवा राणी या नावाने कारभार पाहत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलल्याचा गुन्हा राजद्रोह होता. स्वातंत्र्या नंतर सरकारच्या विरोधात बोलल्याचा गुन्हा देशद्रोह किंवा राजद्रोह ठरवला गेला आहे. मात्र 124 अ अंतर्गत दाखल गुन्हा हा अभिवक्ती स्वातंत्र्यावर गदा येते का, हा ही महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो आहे. राजद्रोहच्या कलमामध्ये कोणत्या प्रकारे लेखनाने अथवा तोंडी बोलल्याने सरकार उलथवून टाकणे किंवा सरकारबद्दल कटकारस्थान करणे हे जर असेल तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे तो देशद्रोह मानला जाईल. मात्र, सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करणार वक्तव्य असेल, सरकारच्या क्रुत्याचा निषेध करणार वक्तव्य असेल तर तो राजद्रोह मानला जात नाही, अस माझ वैयक्तिक मत असल्याच उज्वल निकम यांनी म्हटले.

औरंगाबादच्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे? - आम्हाला राज्यात दंगे नको आहेत. मुस्लीम लोकांना पण त्रास होतो. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक विषय आहे. त्याला धर्म लावला तर आम्ही धर्माने उत्तर देऊ. आम्हाला परिस्थिती खराब करायची नाही, असे राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad rally ) यांनी सांगत, उत्तर प्रदेशात जर भोंगे काढले तर महाराष्ट्रात का नाही. सर्व भोंगे अनधिकृत आहेत, कोणाकडे परवानगी नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तर तीन तारखेला ईद आहे. आम्हाला ती खराब करायची नाही. मात्र, चार तारखेला ऐकणार नाही. भोंगे बंद झाले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. तसेच या आधी पण लाऊड स्पीकरवर ( Raj Thackeray on Hanuman Chalisa in Aurangabad ) बोललो, अनेक जन बोलले, मी फक्त पर्याय दिला, तुम्ही जर काढले नाही, तर आम्ही हनुमान चालीसा ( Raj Thackeray on loudspeaker in Aurangabad rally ) मोठ्या आवाजात लावू. मस्जिदबरोबरच मंदिरांवरचे अनधिकृत भोंगे काढू. पण मस्जिदवरचे काढल्यानंतर, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - blast at Tata Steel : जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट; पाच ते सात जखमी

Last Updated : May 7, 2022, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.