अहमदनगर - राहाता शहराजवळील नगर मनमाड महामार्गावर दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. हा अपघात आज पहाटे पाचच्या सुमारास घडला असून राजस्थान येथील ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लिनर जखमी झाला आहे.
राहाता शहराजवळ महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रकने पाठूमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की उभा असलेला ट्रक थेट दुभाजकावर चढला आणि धडक देणाऱ्या राजस्थानच्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला.
या अपघातात राजस्थान येथील ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, क्लिनर जखमी झाला आहे. कॅबीनचा चक्काचूर झाल्याने ट्रक ड्राव्हरचा मृतदेह काढण्यास पोलिसांना तीन तास प्रयत्न करावे लागले.