ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात २ नवे रुग्ण, तर ६ रुग्ण कोरोनामुक्त - ahmednagar corona updates

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३१ झाली आहे. याशिवाय मूळच्या श्रीरामपूर तालुक्यातील एका बाधित व्यक्तिचा पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. याशिवाय, आज आणखी ०५ जणांना त्यांचे १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात २ नवे रुग्ण, तर ६ रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात ११ रुग्णांवर उपचार सुरू

author img

By

Published : Apr 20, 2020, 11:00 PM IST

अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठवलेल्या अहवालापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्ही बाधित काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या रुग्णांची मुले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३१ झाली आहे. याशिवाय मूळच्या श्रीरामपूर तालुक्यातील एका बाधित व्यक्तिचा पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. याशिवाय, आज आणखी ०५ जणांना त्यांचे १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात २ नवे रुग्ण, तर ६ रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात ११ रुग्णांवर उपचार सुरू
अहमदनगर जिल्ह्यात २ नवे रुग्ण, तर ६ रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात ११ रुग्णांवर उपचार सुरू

एका ७६ वर्षीय व्यक्तिचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना संस्थात्मक आणि रूग्णालय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता १८ झाली आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये ११ जण उपचार घेत आहेत. जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्यात त्याचे २९ आणि ३५ वर्षीय मुलगे बाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाची संख्या आता ३१ झाली आहे. याशिवाय मूळच्या श्रीरामपूर तालुक्यातील एका बाधित व्यक्तीचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.

दरम्यान, १२ रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, मुकुंदनगर येथील ७६ वर्षीय बाधित रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन रूग्णालय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.