ETV Bharat / state

Two Died : क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने 105 फूट खोल पडून पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू - Ahmednagar

कोपरगाव शहरातील मुर्शदपूर शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Apr 24, 2022, 10:42 PM IST

अहमदनगर - कोपरगाव शहरातील मुर्शदपूर शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. जेठालाल जग्गुलाल भिल (वय 34 वर्षे) व त्यांची पत्नी शांती जेठालाल भिल (वय 30 वर्षे, दोघे रा. मोखमपुरा ता. आशिंद, जिल्हा भिलवाडा, राजस्थान ), असे पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घटनास्थळ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारातील गणेश कारभारी राहाणे यांच्या शेतात 105 फुटावर विहिरीचे खोदकाम सुरू होते. रविवारी (दि. 24 एप्रिल ) सकाळी 10 वाजेच्या सुमारास मजुरांनी काम करण्यास सुरुवात केली. विहिरीत खोदकाम करण्यासाठी भिल दाम्पत्य क्रेनच्या माडीमध्ये उभे राहून विहिरीत उतरत होते. त्यावेळी अचानक क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने माडी वेगाने खाली 105 फूट खोल विहिरीत दगडावर आदळली व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक भरत दाते हे करीत आहे.

हेही वाचा - Prithviraj Patil : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील साईचरणी नतमस्तक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.