ETV Bharat / state

कर्जतच्या रथ यात्रेत सीसीटीव्ही'च्या मदतीने दहा महिलांसह वीस चोरटे पकडले - Rath Yatra to Karjat

गेली दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कर्जतची रथ यात्रा भरली नव्हती. यंदा नागरिकांच्या उच्चांकी गर्दीचा आकडा पार झाला. दरम्यान, या गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुबाडणारे चोरटेही येथे आले होते. दरम्यान, कर्जत पोलीसांच्या नजरेतून चोरटे सुटले नाहीत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नियोजनातून लावलेल्या ट्रॅपमधून अगदी सहा तासांमध्ये एक नव्हे तर तब्बल वीस सराईत चोरटे कर्जत पोलिसांच्या ताब्यात.

दहा महिलांसह यात्रेत पकडले वीस चोरटे;
दहा महिलांसह यात्रेत पकडले वीस चोरटे;
author img

By

Published : Jul 27, 2022, 8:44 PM IST

अहमदनगर (शर्डी) - गेली दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कर्जतची रथ यात्रा भरली नव्हती. यंदा नागरिकांच्या उच्चांकी गर्दीचा आकडा पार झाला. दरम्यान, या गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुबाडणारे चोरटेही येथे आले होते. दरम्यान, कर्जत पोलीसांच्या नजरेतून चोरटे सुटले नाहीत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नियोजनातून लावलेल्या ट्रॅपमधून अगदी सहा तासांमध्ये एक नव्हे तर तब्बल वीस सराईत चोरटे कर्जत पोलिसांच्या ताब्यात.

असंख्य सराईत चोरटे - गेली दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कर्जतची रथ यात्रा भरली नव्हती. मात्र, यंदा नागरिकांच्या उच्चांकी गर्दीचा आकडा पार झाला. गर्दीचा घेऊन नागरिकांना लुटण्यासाठी, दागिने, रोकड, चोऱ्या करण्यासाठी असंख्य सराईत चोरटे परजिल्ह्यातून, परगावाहून या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र 'नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता यंदाची रथयात्रा उत्साहात पार पाडायची' असा संकल्प करून कर्जत पोलीस मैदानात उतरले होते. कुठेही गोंधळ होऊ नये, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी उत्कृष्ट नियोजन कर्जत पोलिसांनी केले होते.

सराईत चोरट्यांवर अगोदरही अनेक गुन्हे दाखल - कधी नव्हे ते यंदा रथयात्रेवर २९ सीसीटीव्ही कमेऱ्यांची प्रत्येक नागरिकावर करडी नजर होती. त्यामुळे टवाळखोरांना आणि गुन्हेगारांना मोठा चाप बसला. चोऱ्या करण्यासाठी विविध जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेल्या या सराईत चोरट्यांवर अगोदरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.

हेही वाचा - VIDEO : टोल प्लाझावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराने महिलेला धडकले, 50 मीटरपर्यंत नेले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.