अहमदनगर - शिर्डीतील साकुरी शिव येथील नगर-मनमाड महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोपरगावचा अविनाश भगुरे आणि शिर्डीचा साईनाथ भडांगे या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
राहात्याच्या दिशेने मनमाडकडे दूध घेऊन जात असलेला ट्रक (JK 02, BN 2968) आणि दुचाकी (MH 17, CD 6415) यांच्यात शिर्डीतील साकुरी शिव येथील नगर मनमाड महामार्गवर भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक गंधारे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवरून तपास केला असता अविनाश भगुरे आणि साईनाथ भडांगे हे दोघेजण मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.