ETV Bharat / state

शिर्डीत कोयत्याने वार करून तिघांची हत्या, दोन जण जखमी - triple

या हल्ल्यात इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर कोयत्याचे वार करण्यात आले आहेत.

शिर्डीत कोयत्याने वार करून तिघांची हत्या, दोन जण जखमी
author img

By

Published : Jul 13, 2019, 10:32 AM IST

Updated : Jul 13, 2019, 1:44 PM IST

अहमदनगर (शिर्डी) - विजय नगर येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. शिर्डीत आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या ठाकुर कुटुंबातील पाच जणांवर धारदार शस्त्राणे वार करण्यात आले आहेत. यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जन जखमी झाले आहेत. जखमींवर शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नामदेव ठाकूर (वय 62), दगुबाई ठाकूर (50) आणि खुशी ठाकूर (वय16) अशी मृतांची नावे आहेत. ठाकुर कुटुंब जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच शिर्डीतील हेलिपॅड रोडवरील विजय नगर येथे आले होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी अर्जुन पन्हाळेने किरकोळ वादातून आज (शनिवार) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

शिर्डीत कोयत्याने वार करून तिघांची हत्या, दोन जण जखमी

आरोपी अर्जुन पन्हाळेने कोयत्याने ठाकूर पती-पत्नींचे गळे कापले तसेच त्यांची सोळा वर्षाची मुलगी शाळेत जाण्यासाठी आवरत असताना तिचीही त्याने कोयत्याने वार करून हत्या केली. यात राजेंद्र ठाकूर आणि याच कुटुंबातील आणखी एक मुलगी जखमी झाले आहेत.या कुटुंबातील एक सहा वर्षांची चिमुकली बचावली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलीस निरीक्षक अनील कटके अधिक तपास करत आहेत. या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या आपल्या खोलीत जाऊन बसला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटना स्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला आहे.

Intro:Body:

Shirdi Flash News....

शिर्डीत तिहेरी हत्याकांड ...

निमगाव येथील विजयनगर येथे तीघांची हत्या...

सकाळी घडली खळबळजनक घटना...

तीघांवर कोयत्याचे वार करून केली गेली हत्या...

नामदेव ठाकुर 62,दगुबाई ठाकुर 50

खुशी ठाकुर 16 या तिघांचा मुत्यु... हल्यात दोनजण जखमी...

जखमीवर शिर्डी रूग्णालयात उपचार सुरू...

एका आरोपीला पोलीसांनी घेतले ताब्यात...

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट...

Conclusion:
Last Updated : Jul 13, 2019, 1:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.