ETV Bharat / state

अहमदनगर तहसील कार्यालयात बेकायदेशीर वृक्षतोड; महानगरपालिकेने केला पंचनामा - Illegal tree cutting Ahmednagar

शहरातील पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार पाठवली असून शासनाचे संबंधित विभागच बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणार असेल, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीपल्स हेल्पलाइनचे अ‌ॅड. कारभारी गवळी यांनी दिला.

Illegal tree cutting Ahmednagar tehsil
अहमदनगर तहसील कार्यालयात बेकायदेशीररित्या वृक्षतोड
author img

By

Published : Nov 19, 2020, 8:15 PM IST

Updated : Nov 19, 2020, 8:20 PM IST

अहमदनगर - नगर शहरातील तहसील कार्यालय परिसरात काही जुने वृक्ष परवानगी न घेता तोडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे वृक्ष याच आवारात असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून तोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत काही वृक्षप्रेमींनी तक्रार केल्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेने पंचनामा केला आहे. तसेच, तोडलेल्या झाडांची अगोदरच परस्पर विल्हेवाट लावल्याचेही पुढे आले आहे.

माहिती देताना पीपल्स हेल्प लाईनचे अ‌ॅड. कारभारी गवळी

शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या प्रशस्त जागेमध्ये विविध शासकीय कार्यालय आहेत. या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुनी झाडे आहेत. या झाडांना हात न लावता या ठिकाणी मध्यवर्ती शासकीय इमारतीचे निर्माण करण्यात आले. या इमारतीत अनेक शासकीय कार्यालये आहेत. या परिसरामधील जुनी झाडे तोडण्याचा निर्णय सामाजिक वनीकरण विभागातील काही कर्मचाऱ्यांनी घेतला आणि त्या अनुषंगाने तीन जुनी वृक्षे तोडण्यात आली. मात्र, यासाठी आवश्यक असलेली परवानगी घेतली नसल्याचे समजले आहे. जुनी झाडे तोडण्यात येत असल्याचे वृक्षप्रेमींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतरच हा प्रकार समोर आला.

पीपल्स हेल्पलाइनची सरकारकडे तक्रार -

महापालिकेकडून या प्रकारात पंचनामा केला असला तरी हा फक्त देखावा असून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे. शहरातील पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार पाठवली असून शासनाचे संबंधित विभागच बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणार असेल, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीपल्स हेल्पलाइनचे अ‌ॅड. कारभारी गवळी यांनी दिला.

हेही वाचा - अनलॉकनंतर शिर्डी साई मंदिर परिस्थिती.. तीन दिवसात २४ हजार भक्तांनी घेतले साईबाबांचे दर्शन

Last Updated : Nov 19, 2020, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.