ETV Bharat / state

निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामावरून जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष; उद्या मुख्यमंत्र्याची बैठक

उत्तर नगर जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरून आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत आंदोलने सुरू झाली आहेत. यात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामावरून जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष पेटु लागला आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले  आहे

author img

By

Published : Jun 10, 2019, 8:01 PM IST

निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामावरून जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष; उद्या मुख्यमंत्र्याची बैठक

अहमदनगर - उत्तर नगर जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरून आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत आंदोलने सुरू झाली आहेत. यात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामावरून जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष पेटु लागला आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. उद्या राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांनी बैठकीच आयोजन केले आहे.

तब्बल 182 गावातील नागरिकांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या मुखा जवळील कालव्यांची कामे सुरु करा, अशी मागणी घेऊन गेल्या आठवड्यात तीन तास रास्ता रोको आंदोलन केले होते. या प्रश्नावर न्यायालयातही दाद मागण्यात आली होती.

अकोले तालुक्यातील कालव्यांसाठी संपादन झालेल्या जमिनीवर खुले कालवे न करता ते बंदिस्त स्वरुपात करावे, अशी मागणी अकोल्यातील शेतकऱ्यांनी आणि राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी मधुकर पिचडांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान त्यांनी तेथील काम बंद पाडले होते.
आज हिच मागणी घेऊन निळवंडे धरणाच्या जवळील निब्रळ येथील शेतकऱ्यांनी बैठा सत्याग्रह करण्याचे ठरवले. पाटबंधारे अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन कालव्यांच्या कामासाठी आखणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

हा प्रश्न जास्त चिघळु नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्या एका बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये मधुकर पिचड, राधाकृष्ण-विखे तसेच शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना आमंत्रित केले आहे. कालव्याची कामे सुरु व्हावी, अशी विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे यांची मागणी आहे. तर कालवे हे भूमिगत व्हावे, अशी पिचड यांची मागणी आहे. आता उद्याच्या बैठकीत काय मार्ग निघतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ निळवंडे कालव्याच्या कामा वरुन जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष पेटु लागल्याने या प्रकरणात आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल असुन उद्या राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड शिर्डीचे खाजदार सदाशीव लोखंडे आणि राधाकृष्ण विखे पाटलां समवेत मुख्यमंत्र्यांनी बैठकीच आयोजन केलय....

VO_ निळवंडे धरणाच्या अकोले तालुक्यातील कामे सुरू करण्याची मागणी करत लाभक्षेत्रातील 182 गावातील शेतकर्यांनी आंदोलन केल होत तसेच या प्रश्नावर न्यायालयातही दाद मागण्यात आलेली आहे तर दुसरीकडे अकोले तालुक्यातील कालव्यांसाठी संपादन झालेल्या जमीनीवर खुले कालवे न करता ते बंदीस्त स्वरुपात करावे अशी मागणी अकोलेतील शेतकर्यांनी आणि मधुकर पिचडांनी करत तेथील काम बंद पाडले होते दोन दिवसापुर्वी मधुकर पिचडांच्या नेतूत्वाखाली आंदोलनह करण्यात आल होत दरम्यान आज हीच मागणी घेवुन निळवंडे धरणाच्या जवळील निब्रळ येथे शेतकर्यांनी बैठा सत्याग्रह करण्याच ठरावले होते याच दरम्यान पाटबंधारे अधिकार्यांनी तीथे जावुन कालव्यांच्या कामा साठी आखणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास शेतकर्यांनी विरोध केला आहे हा प्रश्न जास्त चिघळु नये या साठी मुख्यमंत्र्यांनी उद्या एका बैठकीच आयोजन केल असुन यात मधुकर पिचड, राधाकूष्ण विखे तसेच शिर्डीचे खाजदार सदाशीव लोखंडे यांना आमंत्रीत केलय कालव्यांची कामे सुरु व्हावी अशी विखे लोखंडेंची मागणी असुन पिचडांची कालवे भुमिगत करावी अशी त्यात आता उद्याच्या बैठकीत काय मार्ग निघतो या कडे सर्वांचे लक्ष लागलय....

BITE_ सदाशीव लोखंडे खाजदार शिर्डीBody:MH_AHM_Shirdi Dam Meeting On CM_10 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Dam Meeting On CM_10 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.