अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सांगवी येथील शेतकरी महेश युवराज तळपाडे यांच्या शेतातील टोमॅटोचे पीक (tomato crop) अज्ञात इसमाने उपटून (tomato crop was uprooted by unknown person) फेकले आहे. त्यामुळे महेश तळपाडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसात महेश तळपाडे यांची सांगवी शिवारात शेतजमीन आहे. त्यातीत 20 गुंठे शेतीत तळपाडे यांनी टोमॅटोचे पीक (Mahesh Talpade tomato crop uprooted by unknown person) घेतले. टोमॅटो पिकाला सध्या चांगला भाव मिळत असल्याने तळपाडे यांनी टोमॅटोची तोडणी सुरू केली होती.
टोमॅटोमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन : देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना शेतकऱ्याचे टोमॅटोचे पीक उपटून फेकल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. टोमॅटोला सध्या 150 ते 200 रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले असून टोमॅटोमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन (Good day for farmers due to tomatoes) आले आहेत. मात्र हे अच्छे दिन काही विकृत प्रवृत्तीच्या नागरिकांना चांगले दिसत नाहीत. त्यामुळे सांगवीतील तळपाडे यांच्या शेतातील पीक अज्ञाताने उपटून फेकले आहे. अज्ञाताने रात्रीचा फायदा घेत टोमॅटोचे पीक उपटून फेकत काही झाडांची कत्तल देखील केली आहे.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा : टोमॅटोचे पीक रात्रीच्या अंधारात अज्ञात व्यक्तीने उखडून टाकल्याने लाखो रुपयांचा तळपाडे यांना फटका बसला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या एकाही मालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी राजा हतबल आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान करण्याच्या घटनात वाढ झाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी कोथिंबीर, मेथी, कोबी या पिकांवर अक्षरश: नांगर फिरवला. टोमॅटो हे एकमेव पीक आहे, ज्याला बाजारात चांगला भाव मिळत आहे. सांगवी येथील महेश तळपाडे यांनी नुकतेच टोमॅटोचे 20 गुंठ्यात पीक घेतले होते. मात्र, काल रात्री अज्ञात व्यक्तीने तळपाडे यांच्या शेतातील टोमॅटोचे पीक उपटून तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे महेश तळपाडे या तरुण शेतकऱ्याने अकोले पोलीसठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या : काही महिन्यांपूर्वी टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र गेल्या दोन महिन्यांत टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक टोमॅटोचा वापर अत्यंत जपून करत आहेत. तर दुसरीकडे टोमॅटो पिकामुळे अनेक शेतकरी लखपती झाले आहेत.
हेही वाचा -
Mortgage for Tomato : टोमॅटोसाठी कायपण; चक्क दोन अल्पवयीन मुलांना दुकानदाराकडे ठेवले गहाण
Tomato Price : आता एक टोमॅटो मिळतोय 20 रुपयांना; प्रति किलोचा दर जाणून बसेल धक्काच
Tomato Theft : पुणे जिल्ह्यात टोमॅटोची चोरी, शेतकऱ्याचे तब्बल 400 किलो टोमॅटो चोरीला!