ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

तीन वर्षीय ज्ञानेश्वरी आपल्या आजीसोबत घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने हल्ला करत तिला शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतात नेले. या घटनेत मानेवर खोलवर गंभीर जखम झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

ahamadnagar
बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
author img

By

Published : Feb 1, 2020, 8:04 AM IST

अहमदनगर - श्रीरामपुर तालुक्यातील गळनिंब येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वरी नामदेव मारकड असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारस घडली.

हेही वाचा - प्रशांत गडाखांचा 'बच्चन स्टाईल' डान्स... ‘रंग बरसे’ गाण्यावर धरला ठेका

ज्ञानेश्वरी आपल्या आजी सोबत घरासमोरील अंगणात खेळत असताना बिबट्याने झडप घालून तिला शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतात नेले. नागरिकांनी आरडा ओरड करुन ऊसात मुलीचा शोध घेतला. या हल्ल्यात मुलीच्या मानेवर खोल जखम झाल्याने तिला जखमी अवस्थेत तातडीने लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मागील पाच महिन्यांपूर्वीही गणपतीच्या मंदिरातून येत असलेल्या दर्शन चंद्रकांत देठे या मुलाला चुलतीच्या हातातून बिबट्याने ओढून नेल्याची घटना याच परिसरात घडली होती. दरम्यान आज पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Intro:

ANCHOR_ श्रीरामपुर तालुक्यातील गळनिंब येथे घराच्या पोर्च मध्ये आजी बरोबर खेळत असलेल्या 3 वर्षीय मुलीवर बिबटयाने हल्ला केला असून या हल्लात मूलीचा मृत्यु झाल्याची धक्का दायक घटना घडलीय....

VO_ श्रीरामपुर तालुक्यातील गळनिंब येथील नामदेव भाऊसाहेब मारकड यांची ३ वर्षाची ज्ञानेश्वरी आज सांध्यकाळी 7 वाज़ेच्या सुमारास बंगल्याच्या पोर्च मध्ये आपल्या आजी बरोबर खेळत असताना बिबट्याने अचानक झडप घालून घरा जवळ असेलेल्या शंभर ते दीडशे फुट अंतरावर उसाच्या शेतात नेले नागरीकांनी आरडा ओरड करुन उसात मुलीचा शोध घेतला...मानेवर खोल जखम झालेली व जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला तातडीने लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान या तीन वर्षीय मुलीचा मृत्यु झालाय...मागील पाच महीन्यापूर्वी गणपतीची आरती आटोपुन येत असलेल्या दर्शन चंद्रकांत देठे मुलास चुलतीच्या हातातुन बिबट्याने ओढुन नेल्याची घटना याच परिसरात घडली होती आणि आज पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांना मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे....Body:mh_ahm_shirdi_leopard attack girl death_1_photo_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_leopard attack girl death_1_photo_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.