अहमदनगर : नगर-सोलापूर महामार्गावर एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. आंबिलवाडी (ता.नगर) शिवारामध्ये झालेल्या या आपघातात तिघांचा मृत्यू झाला असून पाच जखमी झाले आहेत.
या अपघातात अरुण बाबुराव फुलसुंदर (वय ६०), अर्जुन योगेश भगत (वय १४) आणि तारा शंकर भगत यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तीनही मृत नगरचे रहिवासी आहेत. अपघातात रत्ना अर्जुन फुलसुंदर यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा - वाघिणीच्या शोधात तब्बल 1700 किमीचा प्रवास; C-1 वाघाची अंजिठ्याकडे कूच
अक्कलकोटकडून मालेगावकडे जाणारी बस अंबिलवाडीजवळ समोरून येणाऱ्या चार चाकी वाहनाला जोरात धडकली. वाहनांच्या धडकेची तीव्रता जास्त असल्याने त्यांचा चुराडा झाला. शनिवारी झालेल्या या अपघातामुळे नगर-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.