राहुरी (अहमदनगर) - मळीमिश्रीत विषारी पाण्यामुळे राहुरी तालुक्यातील आंबी येथील प्रवरा नदीवरील गंगापूर बंधाऱ्यात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील चिंचोली, कुरणपूर, गंगापूर, मांडवे, गळनिंब, फत्याबाद आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिक हैराण झाले आहेत.
प्रवरा नदीमध्ये वरील भागातून मोठ्या प्रमाणात मळीमिश्रीत विषारी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सध्या गंगापूर, गळनिंब बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्या पाण्यात मळीमिश्रीत पाणी मिसळल्यामुळे नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून मेलेल्या माशांचा तवंग पाण्यावर साचला आहे. या मेलेल्या माशांमुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. बंधाऱ्यावरून नाकाला रुमाल बांधून जावे लागत आहे. हे दूषित पाणी पिल्यामुळे माणसे व जनावरे आजारी पडू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर संबंधित विभागाने लक्ष घालून नदीकाठच्या लोकांना या समस्येतून मुक्त करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
हेही वाचा - दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर मालगाडीचे दहा डबे घसरले, रेल्वे वाहतूक विस्कळीत
हेही वाचा - अहमदनगरमध्ये जमिनीच्या वादातून एकाचा चाकू भोकसून खून