ETV Bharat / state

डिटोनेरचा वापर करत फोडले एटीएम; लाखो रुपयांची रोकड लंपास - एटीएम डिटोनेरच्या साहाय्याने फोडले

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा प्रॉडक्ट इंडिकॅश कंपनीचे एटीएम आहे. आज (रविवारी) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डिटोनेरच्या सहाय्याने स्फोट घडवून हे एटीएम फोडले आहे. त्यानंतर त्यातील रोकड लंपास केली. चोरट्यांनी आधी एटीएमशेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या तसेच सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला.

atm
atm
author img

By

Published : Oct 10, 2021, 7:02 PM IST

Updated : Oct 10, 2021, 7:15 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - डिटोनेरच्या साह्याने एटीएममध्ये स्फोट घडवून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. तीन जणांनी मोटार सायकलवरून येत हा गुन्हा केला असल्याची माहिती आहे. पोलीसांनी इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.

डिटोनेरचा वापर करत फोडले एटीएम
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा प्रॉडक्ट इंडिकॅश कंपनीचे एटीएम आहे. आज (रविवारी) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डिटोनेरच्या सहाय्याने स्फोट घडवून हे एटीएम फोडले आहे. त्यानंतर त्यातील रोकड लंपास केली. चोरट्यांनी आधी एटीएमशेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या तसेच सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांनी घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र कड्या बाहेरुन लावलेल्या असल्याने चोरट्यांना लुटीसाठी वेळ मिळाला. एटीएम फोडल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सहायक पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान याठिकाणी ठसे तज्ज्ञ व डॉग स्कॉडच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान लोणी पोलिसांपुढे आहे. पोलिसांनी तीन पथके स्थापन करत तपास सुरु केला आहे. अशाप्रकारे एटीएम फोडुन रोकड लंपास करण्याची ही जिल्हातील पहीलीच घटना आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांना आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी ५ लाखांची अर्थिक मदत

Last Updated : Oct 10, 2021, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.