अहमदनगर - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. शिर्डीमध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात धुके पहायला मिळत आहे. त्यामुळे साईबाबांची शिर्डीनगरी धुक्यात हरवली होती. साईमंदिर परीसर आणि मंदिराचा कळसही पूर्णपणे धुक्याने आच्छादल्या होत्या.
रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत होत्या. लाईट सुरू ठेवून वाहने चालवावी लागत होती. मात्र, असे असले तरी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सकाळी नागरिक मोठ्या प्रमाणत घराबाहेर पडले होते. साईबाबांच्या दर्शानासाठी आलेल्या भाविकांनी या धुक्याचा आणि वातावरणाचा आनंद घेतला.