ETV Bharat / state

...तर नाशिक अहमदनगरसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटेल- छगन भुजबळ - water problem of Marathwada

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पाण्यावर राज्याचा हक्क आहे. मात्र हे पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले तर भविष्यात जिल्ह्या-जिल्ह्यातील भांडणे मिटतील. असे भुजबळ म्हणाले. आज गोदावरी उजवा तट कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ
author img

By

Published : Nov 8, 2020, 3:01 PM IST

अहमदनगर - महाराष्ट्राच्या जमिनीवर पडणाऱ्या पाण्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे. मात्र याठिकाणी डोंगर अधिक असल्याने हे पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी गुजरातला न जाता महाराष्ट्रात वळविले तर नाशिक अहमदनगरसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण लढा देत आहोत. असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ

...तर प्रांता-प्रांतातील वाद संपुष्टात येतील-

राहाता येथील पाटबंधारे विभागाच्या इन्स्पेक्शन बंगलो परिसरात गोदावरी उजवा तट कालवा सल्लागार समिती बैठक पार पडली आहे. या बैठकी दरम्यान छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जावू न देता हे पाणी महाराष्ट्रात वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे पाणी आल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठका घेण्याची गरज पडणार नाही. पाण्याचा साठा अधिक कसा वाढेल, यासाठी प्रयत्न केला तर प्रांता-प्रांतातील वाद संपुष्टात येतील. त्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या पाच वर्षात कालव्याची दुरुस्ती न झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी सोडविण्यास आपण कटिबद्ध असून राहिलेली विकास कामे लवकर करण्यात येणार असल्याचे भुजबळ म्हणाले.

आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी-

आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी आहे. देशातून आणि जगातून जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही. तोपर्यंत नागरिकांनी कोरोनाबाबत काळजी घ्यावी. दिवाळी आनंदात साजरी करावी. मात्र या दिवाळीला जबाबदारीची किनार आहे. त्याचा नागरिकांनी विचार करावा, असे भुजबळ म्हणाले.

शासनाचे नागरिकांना वाचविण्यासाठी प्राधान्य-

भुजबळ म्हणाले, कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सर्व लोक अडचणीत आले आहेत. अनेकांना स्थलांतर करावे लागले. तसेच अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले. कोरोनाचा फटका नागरिकांसोबत शासनालाही बसला आहे. पंरतु अशा परिस्थितीतही शासनाचे नागरिकांना वाचविण्यासाठी प्राधान्य आहे. त्यामुळे आरोग्य, अन्न धान्य आणि पोलीस विभागावर खर्च करण्यात येत आहे.

केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी-

२५ ते ३० हजार कोटी रुपये जीएसटीचे पैसे केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे. हे अर्थ चक्र आता पुन्हा सुरू होत असून हळूहळू सरकारच्या तिजोरीत पैसे येतील आणि नागरिकांची कामे होतील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- अर्णब गोस्वामींची रवानगी तळोजा कारागृहात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.