ETV Bharat / state

Water Struggle Over : कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या तहानलेल्या वाडीचा पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपला - अखेर तहानलेल्या शाकीरदरावाडीचा

अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या बारी, जहागीरदार वाडी, चिचोंडी, मूरशेत, पांजरे या आदिवासी गावांमध्ये जलस्रोत निर्मितीसाठी व पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी ए.एस.के फाउंडेशन मुंबई व बायफ संस्था संचलीत समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत.

The struggle for drinking water
पिण्याच्या पाण्याचा संघर्ष
author img

By

Published : Mar 16, 2023, 6:10 PM IST

शिर्डी: अकोले तालुक्यातील पांजरे गावातील शाकीरदरावाडी मध्ये अद्याप पर्यंत पिण्याच्या पाण्याची वणवण थांबली नव्हती. ही बाब बायफ संस्था संचलीत समृद्ध किसान प्रकल्पाच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याचे ठरले. ठाकर समाजाची सुमारे 25 घरे कळसुबाई परिसरातील डोंगराच्या कुशीत अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. जोरदार पावसाचा हा प्रदेश मानला जातो. अगदी कळसुबाई शिखराच्या मागील बाजूस पायथ्याशी असलेले पांजरे हे आदिवासी बहुल गाव आहे.

The struggle for drinking water
पिण्याच्या पाण्याचा संघर्ष

बहुतेक ठाकर समाजाची लोक वस्ती असलेले अतिदुर्गम गाव म्हणून याची नोंद आहे. भंडारदरा धरणाच्या जलसाठ्यालगत असलेले हे गाव. धरणातील पाणीसाठा खोलवर गेल्यानंतर गावची तहान भागवण्यासाठी महिलांना वणवण करत फिरावे लागते. पाण्याच्या शोधात डोक्यावर हंडा घेऊन महिलांना जीवघेणी कसरत करावी लागते. त्यातूनच शाकीरदरावाडी दूर डोंगरात वसलेली असल्याने तिथे उन्हाळ्यात पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष असायचे.

The struggle for drinking water
पिण्याच्या पाण्याचा संघर्ष

वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या कधीही संपू शकत नाही असेच इथल्या लोकांना वाटत होते. ही समस्या समजून घेत प्रकल्पाने अतिशय जलद गतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे ठरवले. वाडीतील लोकांनीही पिण्याच्या पाण्यासाठी श्रमदान करण्याचे मान्य केले. विहिरीसाठी पाणी परीक्षण तांत्रिक पद्धतीने करण्यात आले. ज्या भागात वर्षभर पाणी उपलब्ध राहील त्या जागेची निवड भूगर्भ तज्ञांकडून करण्यात आली.

तात्काळ अंदाजपत्रक तयार करून मंजूर करून घेण्यात आले. सुमारे एक महिन्याच्या कालावधीतच विहीर खोदून बांधकाम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. भर उन्हाळ्यात विहिरीला असलेले भरपूर पाणी बघून ग्रामस्थ सुखावले आहे. शाश्वत आणि वर्षभर पुरणारे पाणी वाडी जवळच उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहात संचारला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. पाणी वापर समिती तयार करून त्यांच्याकडे विहीर व जलस्रोत हस्तांतरित करण्यात आला आहे.

प्रकल्पाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन ए.एस.के फाउंडेशन मुंबई चे सी. एस .आर. हेड सिद्धार्थ अय्यर व प्रकल्प समन्वयक शिवाजी आदमाने तसेच बायफ संस्थेचे राज्य समन्वयक सुधीर वागळे व विभाग प्रमुख जितीन साठे यांच्याकडून दिले जात आहे. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी बायफ संस्थेचे कर्मचारी जलतज्ञ रामनाथ नवले , विष्णू चोखंडे , किरण आव्हाड , गोरख देशमुख , वर्षा भागडे , मच्छिंद्र मुंढे , सुनील बिन्नर , यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक कार्यकर्ते श्रावण उघडे , राजू उघडे , बबन उघडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.प्रकल्पाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन ए.एस.के फाउंडेशन मुंबई चे सी. एस .आर. हेड सिद्धार्थ अय्यर व प्रकल्प समन्वयक शिवाजी आदमाने यांच्याकडून दिले जात आहे.

हेही वाचा : H3N2 death in Maharashtra : महाराष्ट्रात H3N2 चा पहिला मृत्यू? कोरोनासह इन्फ्लूएंझाची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.