ETV Bharat / state

Wedding Theft In Shirdi : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शिर्डीत उच्छाद

शिर्डीत येत लग्न समारंभात चोऱ्या (Wedding Theft In Shirdi) करणाऱ्या चोरट्यांनी शिर्डी परिसरात उच्छाद मांडला आहे. अनेक जण लग्नासाठी शिर्डीला प्राधान्य देतात. मात्र या प्रकारांमुळे शिर्डीचे नाव देशपातळीवर खराब होऊ लागले आहे.

Wedding Theft In Shirdi
लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शिर्डीत उच्छाद
author img

By

Published : Dec 14, 2021, 5:27 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - मोठ्या हॉटेल व्यवस्थामुळे राज्यभरातून शिर्डीला येवुन लग्न (Marriage In Shirdi) करण्यााकडे लोकांचा कल वाढतोय. मात्र त्याचाच फायदा घेत या लग्न सभारंभात लुट करणाऱ्या टोळ्यांनीही उच्छाद (Wedding Theft In Shirdi) मांडलाय. शिर्डीतील एका हॉटेलमध्ये मालेगाव आणि औरंगाबाद येथील परीवाराचा लग्न सभारंभ होता. या कार्यक्रमातून अडीच लाख रुपयांची चोरी करणाऱ्या उत्तरप्रदेश येथील दोन जणांना पोलिसांनी अटक केले (Two Suspects Arrested) आहे. शिर्डीत लग्नातून चोरी करून नाशिक आणि ठाणे येथील लग्नातही या चोरांनी चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील
अडीच लाखांची बॅग लांबवली

शिर्डीतील नगर - मनमाड महामार्गालगत (Shirdi Manmad Highway) असलेल्या हॉटेल शांतीकमल येथे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव येथील जैन आणि औरंगाबाद येथील सुराणा यांच्या कुटुंबातील विवाहसोहळा होता. खर्च करण्यासाठी नवरदेवाचे वडील महेंद्र जैन यांनी आपाले नातेवाईक युवराज जैन यांच्याकडे 2 लाख 50 हजार रुपये दिले होते. ते पैसे त्यांनी एका हँड बॅगमध्ये ठेवलेले होते. लग्नाच्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान हळदीचा कार्यक्रम सुरू असताना, त्यांना ती रक्कम असलेली बँग नातावाईकांशी बोलत असतांना शेजारील खुर्चीवर ठेवली होती. गप्पांच्या नादात त्यांच लक्ष विचलीत झाल्याचं लक्षात येताच, लग्न सभारंभात पाहुण्याच्या रुपात घुसलेल्या चोरट्यांनी डाव साधत अडीच लाखांवर डल्ला मारलाय.

गुन्हा दाखल, आरोपीही ताब्यात
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अडीच लाख रुपये चोरून नेल्याची फिर्याद युवराज अमृतलाल जैन यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) दाखल केली होती. शिर्डी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध भा.द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते. हॉटेलमधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता, त्यांना दोन संशयित तरुण हातात बॅग घेऊन जाताना दिसून येत असल्याने त्यांचा शोध सुरू केला (Thieves Found On CCTV) होता. या तपासादरम्यान शिर्डी पोलिसांनी आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन जणांनी शिर्डीनंतर नाशिक आणि ठाणे येथील लग्नातही चोरी केली असून, या दोघांनाही ठाणे पोलिसांनी अटक केले आहे. हे दोघेही उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे. ठाणे पोलीस लवकरच या आरोपींना शिर्डी पोलिसांकडे स्वोपवणार असून, पुढील तपास शिर्डी पोलीस करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील (PI Gulabrao Patil) यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.