अहमदनगर - राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे काल (गुरुवारी) मध्यरात्री एका शेतकऱ्याने राहत्या घरातील छताच्या आढ्याला नायलॉन दोरीने सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच त्यांची तीन वर्षांची मुलगी पलंगावर मृतावस्थेत आढळली. मुलीच्या गळ्याजवळ लाल व्रण असल्याने, तिचा गळा दाबून खून करुन, बापाने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त होत आहे.
अनिल दिनकर पाळंदे (४७) रा. पाळंदे वस्ती, दवणगाव असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर, आदिरा अनिल पाळंदे (३) असे मृतावस्थेत आढळलेल्या मुलीचे नाव आहे. मुलीचा मृतदेह नगर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. मृत अनिल यांची पत्नी बाळंतपणासाठी आंबी स्टोअर येथे माहेरी गेलेली होती. आठ दिवसांपूर्वी त्यांना मुलगी झाली आहे. घरात अनिल व त्यांची तीन वर्षांची मुलगी एका खोलीत झोपले होते. तर, दुसऱ्या खोलीत अनिलचे आई-वडील झोपले होते. आज सकाळी सहा वाजता अनिल यांनी खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे, त्यांच्या आई-वडिलांनी आसपासच्या लोकांना बोलविले. खोलीत अनिल यांनी गळफास घेतलेला व मुलगी मृतावस्थेत आढळली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल यांनी घटनास्थळी पाहणी करुन, पंचनामा केला. मृताचे दोन भाऊ नाशिक येथे राहतात. त्यांना तातडीने बोलविण्यात आले. मृत आदिरा हिच्या गळ्याजवळ लाल व्रण आढळला. त्यामुळे तिचा गळा दाबून खून करून नंतर अनिलने गळफास घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. अनिलचा मृतदेह राहुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तर, आदिराचा मृतदेह न्याय वैद्यक तपासणीसाठी नगर येथे हलविण्यात आला. अनिलच्या आत्महत्येचे कारण समजले नसून दोन्ही प्रकरणात राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या केली; तीन वर्षांची मुलगीही मृतावस्थेत
दवणगाव येथे काल (गुरुवारी) मध्यरात्री एका शेतकऱ्याने राहत्या घरातील छताच्या आढ्याला नायलॉन दोरीने सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच त्यांची तीन वर्षांची मुलगी पलंगावर मृतावस्थेत आढळली आहे.