अहमदनगर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात असलेल्या राहाता शहरातील आरोपी जनार्धन चंद्रया बडिवार याला न्यायालयात नेताना कंटेनरचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्या आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, बडिवार याचा घातपात झाल्याचा संशय त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी व्यक्त केल्याने बडीवार याच्या मृत्यूचे नेमक कारण काय, हे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने राहाता तालुक्यातील काही गावांमध्ये छापे टाकून चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींना श्रीरामपूर येथील कारागृहातून मंगळवारी (दि. 3 ऑगस्ट) त्यांना राहाता न्यायालयात हजर करण्यासाठी नेले जात होते. त्यावेळी बाभळेश्वर येथील यमुना हॉटेलच्या खाली असणार्या राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात आरोपींना आणण्यात आले होते. यातील जनार्धन चंद्रया बडिवार (वय 46 वर्षे, रा. राहाता) यास लघुशंकेसाठी बाभळेश्वर बस स्थानकावर घेउन जात असताना एका कंटेनरचा धक्का लागला. त्यामुळे बडिवारला कंटेनरच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. मात्र, माझ्या मेव्हण्यावर खोटा गुन्हा दाखल करुन घातपात केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवींद्र तालापल्ली यांनी केली आहे.
पोलिसांनी अकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली असून घटनास्थाळाजवळ असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - मनसेकडून कोकणातील पुरग्रस्त बांधवांना मदत, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक सरसावले