अहमदनगर (शिर्डी) - कोविड संकटाची भीषणता आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. ऑक्सिजनची कमतरताही जाणवत असल्याने सर्वच व्यवस्थांपुढे आता आवाहानात्मक परिस्थिती बनल्याने या संकटावर मात करण्यासाठी मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी एकत्रितपणे कृतज्ञता निधी जमा केला. या निधीतून खरेदी केलेले आक्सि कंट्रोलर मशीन ग्रामीण रुग्णालय तसेच प्रवरा कोविड केअर सेंटरला देण्याचा निर्णय शिक्षकांनी केला.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पाच ऑक्सिजन कंट्रोलर मशिन प्रवरा कोविड केअर सेंटरला देण्यात आले. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री आण्ण्साहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या उपस्थितीत शिक्षक प्रतिनिधींनी ऑक्सिजन कंट्रोलर मशिन सुपूर्द केले.
कोविड संकटाला तोंड देण्याची जबाबदारी सर्वच समाज घटकांवर आली आहे. सामाजिक बांधिलकी मानून राहाता तालुक्यातील शिक्षकांनी तयार केलेला कृतज्ञता निधीची मदत या संकटात दिलासा देणारी असल्याची भावना विखे पाटील यांनी व्यक्त केली. कृतज्ञता निधीत योगदान दिलेल्या शिक्षकांना गौरव पत्र देवून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
हेही वाचा - 'नगरमधील विळद घाटात दीड कोटीचा ऑक्सिजन प्लांट उभारणार'