ETV Bharat / state

'तबलिगी मरकझमुळे जिल्ह्यातील रुग्ण वाढले, हॉट स्पॉट वगळता लॉकडाऊन मागे घ्यावा'

हॉट स्पॉट सोडून इतर ठिकाणी लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मत मांडणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले. जिल्ह्यात कोरोनाशी थेट संपर्कात असलेल्या आरोग्य यंत्रणेला पीपीई किट उपलब्ध असून थर्मल स्कॅनरसुद्धा उपलब्ध होणार आहेत.

tbiligi-merkaz-increased-number-of-corona-patients-in-ahmedgager-district

author img

By

Published : Apr 7, 2020, 4:04 PM IST

अहमदनगर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. जिल्ह्यात सुरुवातीचे चार कोरोनाबाधित वगळता जवळपास सलगपणे 21 रुग्ण हे मरकझ येथून आलेले आहेत. किंवा त्यांच्या संपर्कातील असल्याची माहिती पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

हेही वाचा- Coronavirus : राज्य मंत्रिमंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक, लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आरोग्य महसूल आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला विविध सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस प्रमुख अखलेश कुमार सिंह यांची उपस्थित होती.

जिल्ह्यामध्ये विदेशी नागरिकांसह जिल्ह्यातील काहीजण निझामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभामी होते. त्यांच्यामुळे नगर शहरात 11, जामखेड 6, नेवासे 2, राहाता 1 आणि श्रीरामपूरमधे 1 असे एकूण 21 रुग्ण वाढल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या भागामध्ये आरोग्य यंत्रणेने मोठे परिश्रम घेत संशयितांचे स्वॅब नमूने घेतले. तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. जिल्हा प्रशासनाने परस्थिती नियंत्रणात ठेवली असल्याचा निर्वाळा मुश्रीफ यांनी दिला. गरज पडल्यास 28 हजार रुग्णांवर उपचार करू शकू, अशी तयारी प्रशासनाने केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य यंत्रणेकडे शासकीय 8 व्हेंटिलेटर असून खासगी हॉस्पिटलमधून त्याची उपलब्धता होणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, महानगरपालिकेचे एम्स रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून निर्धारित केले आहे.

दिल्ली निझामुद्दीन येथील कार्यक्रमास परवानगी द्यायला नको होती. तेथील सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याचे सांगत मुश्रीफ यांनी एकप्रकारे केंद्र सरकारवर निशाणा साधला.

हॉट स्पॉट सोडून इतर ठिकाणी लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मत मांडणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले. जिल्ह्यात कोरोनाशी थेट संपर्कात असलेल्या आरोग्य यंत्रणेला पीपीई कीट उपलब्ध असून थर्मल स्कॅनरसुद्धा उपलब्ध होणार आहेत.

प्राधान्यक्रम आणि अंत्योदय योजनेतील धान्य पुरवठा सुरळीत सुरू असून केंद्र सरकारच्या जनधन योजना, शेतकरी सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेचे बहुतांशी लाभार्थ्यांचे पैसे जमा झालेले आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकान आणि बँकांसमोर होणारी गर्दी टाळत आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी या ठिकाणी मंडप टाकण्यात येणार आहे. पाणी पिण्याची व्यवस्थाही करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात शासकीय 14 ठिकाणी आणि खासगी 15 ठिकाणी पर राज्य आणि जिल्ह्यातील जवळपास 2 हजार नागरिकांची राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.