ETV Bharat / state

सुजय विखे-पाटलांनी घेतली समाजसेवक अण्णा हजारेंची भेट - Nagar South

दीर्घ उपोषणाने हजारे यांच्या बिघडलेल्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांना भेटलो, असे डॉ. विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

सुजय विखे-पाटलांनी घेतली समाजसेवक अण्णा हजारेंची भेट
author img

By

Published : Mar 17, 2019, 12:12 AM IST

अहमदनगर - काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शनिवारी सायंकाळी सदिच्छा भेट घेतली. विखे घराण्याचा राजकिय व सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याबाबात डॉ. सुजय यांच्यासारख्या तरुणांकडून आपणाला चांगल्या अपेक्षा आहेत, असे अण्णा हजारे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

सुजय विखे-पाटलांनी घेतली समाजसेवक अण्णा हजारेंची भेट

दीर्घ उपोषणाने हजारे यांच्या बिघडलेल्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांना भेटलो, असे डॉ. विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.सुजय विखे पाटील यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, समाज आणि देशहिताचा विचार करून पद्मश्री विठ्ठलराव विखे व बाळासाहेब विखे पाटील यांनी जे राजकारण व समाजकारण केले ते महत्वाचे वाटते. राजकारण हे फक्त समाज, राज्य, राष्ट्रहितासाठीच असते आणि समाजकारण हेही त्यासाठीच असते. त्यात वेगळे काही नसते. फक्त ते अंमलात कसे येईल हे पहिले पाहिजे.

सुजय विखे तरुण मुलगा आहे. त्याला सामाजिक कार्याची परंपरा आहे. पणजोबा, आजोबा यांचा वारसा व त्यांची परंपरा आहे. ती परंपरा ते पुढे चालवतील. कारण हे सर्व त्यांच्या घरात चालत आलेले आहे. म्हणून तर आम्ही अपेक्षा करतो. ती परंपरा समाज, राज्य, राष्ट्रहिताकरिता या तरुणाने चालवावी. फक्त पद भूषविणे एवढाच राजकारणाचा हेतू नाही. तर समाज, राज्य आणि राष्ट्रहिताचा विचार करत असताना आपल्या घराण्याची परंपरा पुढे नेण्याचा विचार झाला पाहिजे. आचार शुध्द, विचार शुध्द, जीवन निष्कलंक , जीवनात त्याग असला पाहिजे, अपमान पचविण्याची ताकद असली पाहिजे. ते निश्चितपणे काही तरी करू शकतील असे मला वाटते. आज ते भेटायला आले एक उमेदवार म्हणून असले तरी ते तरून आहे मला त्यांच्याकडून काही अशा वाटते.

डॉक्टर या नात्याने अण्णांची विचारपूस करायला आलो

ज्या व्यक्तींनी संपूर्ण देशाला वेगळा आदर्श निर्माण करून मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. अशा व्यक्तींचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणे हा मुख्य हेतू होता. युवक या नात्याने त्यांनी मला आशिर्वाद दिले. लोकसभेचा उमेदवार म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्याकडे आलो नव्हतो. अण्णांचे योगदान या जिल्ह्यासाठी, देशासाठी राहिले आहे. अण्णादेखील आमच्या घरी व संस्थेच्या अनेक कार्यक्रमाना नेहमी येत असतात. अनेक दिवसांपासून मी त्यांची वेळ घेत होतो. आज त्यांनी मला वेळ दिला व मी त्यांच्या भेटीला आलो. अण्णांबद्दल आपुलकी आणि डॉक्टर या नात्याने आज येथे आल्याचे डॉ. सुजय पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या दाव्याला जाहीर सभेत उत्तर देऊ

मी स्वत: डॉ. सुजय विखेंना उमेदवारी देतो असे म्हणालो होते, पण सुजय विखेंनी उमेदवारी नाकारली, सुजयला विचारा, असा दावा अजित पवार यांनी केला होता. यावर मला काही माहित नाही असे म्हणत विखेंनी उत्तर देण्याचे टाळले. मात्र, याचे उत्तर मी माझ्या जाहीर सभेमध्ये वेळ आल्यावर देईल असे ते यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Intro:अहमदनगर- अण्णांनी दिला सुजय विखेंना आशीर्वाद.. विखे परिवाराकडे सामाजिक तळमळीची परंपरा..-अण्णा हजारेBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug- mh_ahm_trimukhe_1_sujay_meet_anna_16_march_v

अहमदनगर- अण्णांनी दिला सुजय विखेंना आशीर्वाद.. विखे परिवाराकडे सामाजिक तळमळीची परंपरा..-अण्णा हजारे

अहमदनगर- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवण्यास भाजप कडून सज्ज झालेले डॉ सुजय विखे यांनी अद्यापी उमेदवारी घोषित झालेली नसली तरी महत्वाचे नेते आणि व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका सुरू केला आहे. उमेदवारी वरूनच डॉ सुजय सध्या मिडीयात मोठ्या चर्चेत आहेत. काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव व युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शनिवारी सायंकाळी सदिच्छा भेट घेतली. दीर्घ उपोषणाने हजारे यांच्या बिघडलेल्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांना भेटलो, असे डॉ. विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. दुसरीकडे विखे घराण्याचा राजकिय व सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याबाबात डॉ. सुजय यांच्या सारख्या तरुणांन कडून आपणाला चांगल्या अपेक्षा आहेत, असे हजारे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

विखे घराण्याला सामाजिक कळवळा..-अण्णा
-भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले की, समाज आणि देशहिताचा विचार करून पद्मश्री विठ्ठलराव विखे व बाळासाहेब विखे यांनी जे काही राजकारण व समाजकारण केले ते महत्वाचे वाटते. राजकारण आणि समाजकारण वेगळ नसते असा महत्वाचा पैलू अण्णांनी यावेळी मांडत राजकारण हे फक्त समाज, राज्य आणि राष्ट्रहितासाठीच असते आणि समाजकारण हेही त्यासाठीच असते. त्यात वेगळे काही नसते. फक्त ते अमलात कसे येईल हे पहिले पाहिजे. सुजय विखे तरुण मुलगा आहे. त्याला सामाजिक कार्याची परंपरा आहे. पंजोबा, आजोबा यांचा वारसा व त्यांची परंपरा आहे व ती परंपरा ते पुढे चालवतील. कारण हे सर्व त्यांच्या घरात चालत आलेले आहे. म्हणून तर आम्ही अपेक्षा करतो. ती जी परंपरा आहे ती समाज, राज्य, राष्ट्रहिता करिता परंपरा ह्या तरुणाने चालवावी. शेवटी राजकारणाचा हेतू काय आहे.फक्त पद भूषविणे एवढाच राजकारणाचा हेतू नाही. तर समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार करत असताना आपल्या घराण्याची परंपरा पुढे नेण्याचा विचार झाला पाहिजे. आचार शुध्द, विचार शुध्द, जीवन निष्कलंक , जीवनात त्याग असला पाहिजे, अपमान पचविण्याची ताकद असली पाहिजे हे ते निश्चितपणे काही तरी करू शकतील असे मला वाटते. आज ते भेटायला आले एक उमेदवार म्हणून असले तरी ते तरून आहे मला त्यांच्याकडून काही अशा वाटते.

डॉक्टर या नात्याने अण्णांची विचारपूस करायला आलो..-डॉ सुजय
-ज्या व्यक्तींनी संपूर्ण देशाला वेगळा आदर्श निर्माण करून मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. अशा व्यक्तींचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होतो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणे हा मुख्य हेतू होता. युवक या नात्याने त्यांनी मला आशिर्वाद दिले. लोकसभेचा उमेदवार म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्याकडे आलो नव्हतो. अण्णांचे योगदान या जिल्हासाठी, देशासाठी राहिले आहे. अण्णा देखील आमच्या घरी व संस्थेच्या अनेक कार्यक्रमाना नेहमी येत असतात. अनेक दिवसांपासून मी त्यांची वेळ घेत होतो आज त्यांनी मला वेळ दिला व मी त्यांच्या भेटीला आलो. अण्णांबद्दल आपुलकी आणि डॉक्टर या नात्याने आज इथे आल्याचे डॉ सुजय यांनी यावेळी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या दाव्याला जाहीर सभेत उत्तर देऊ-डॉ सुजय विखे
-अजित पवारांनी कालच मी स्वत: डॉ. सुजय विखेना उमेदवारी देतो असे म्हणाले होते पण सुजय विखेनी ती उमेदवारी नाकारली, सुजयला विचारा, असे आव्हान अजित पवारांनी या उमेदवारी वर दिले. असा प्रश्न डॉ सुजय यांनाविचारला, या प्रश्नावर मात्र मला काही माहित नाही असे म्हणत विखेनी या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले. मात्र याचे जरूर उत्तर मी माझ्या जाहीर सभेमध्ये वेळ आल्यावर देईल असे ते यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे.Conclusion:अहमदनगर- अण्णांनी दिला सुजय विखेंना आशीर्वाद.. विखे परिवाराकडे सामाजिक तळमळीची परंपरा..-अण्णा हजारे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.