ETV Bharat / state

Students returning home : युक्रेन वरून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्‍यांचे विखेनी केले स्‍वागत - Prime Minister Narendra Modi

युक्रेन मध्‍ये अडकलेल्‍या विद्यार्थ्‍यांना (Students stranded in Ukraine) मायदेशी सुखरुप आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Prime Minister Narendra Modi) यासाठी सुरु केलेले मिशन गंगा अभियान दिलासा देणारे ठरल्‍याची प्रतिक्रीया खासदार डॉ.सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी व्‍यक्‍त केली. विद्यार्थी आदित्‍य संतोष नळे आणि निखील सुभाषराव गुळवे यांचे सुखरुप आगमन झाले. विखे पाटील यांनी या विद्यार्थ्‍यांचे स्‍वागत केले.

Students returning home
मायदेशी परतलेले विद्यार्थ्‍यी
author img

By

Published : Mar 5, 2022, 7:50 PM IST

शिर्डी: राहाता तालुक्यातील अस्‍तगाव येथील आदित्‍य संतोष नळे आणि निखील सुभाषराव गुळवे हे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथे गेले होते. परंतू युध्‍दजन्‍य परिस्थितीमुळे त्‍यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन गंगा अंतर्गत युक्रेन मध्‍ये असलेल्‍या भारतीय नागरीकांना सुखरुप आणण्‍यासाठी विशेष मोहीम सुरु केली. या मोहीमेतच हे दोन्‍हीही विद्यार्थी परत आल्‍याबद्दल त्‍यांच्‍या पालकांनी आणि परिसरातील नागरीकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.

Students returning home
मायदेशी परतलेले विद्यार्थ्‍यी

खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी या विद्यार्थ्‍यांची भेट घेवून त्‍यांचे स्‍वागत केले आणि या विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. प्रत्‍येक भारतीयाला मायदेशी सुखरुप आणण्‍यासाठी मोदीनी केलेले प्रयत्‍न हे महत्‍वपूर्ण आहेत. चार केंद्रीय मंत्र्याचे पथक यासाठी तयार करण्‍यात आले असून, प्रत्‍येक भारतीय सुखरुप यावा यासाठीच केंद्र सरकारचा पाठपुरावा सुरु आहे. नगर जिल्‍ह्यातील प्रत्‍येक विद्यार्थी सुखरुप येईल यासाठी केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून आपला पाठपुरावा सुरु असल्‍याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.