अहमदनगर : 61 वी महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेला (State Drama Competition) अहमदनगर केंद्रावर (State Drama Competition held in city Ahmednagar) काल मंगळवार पासून सुरुवात झाली ती वादाने. पहिल्याच दिवशी स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या लेखक-दिगदर्शक उल्हास नलावडे लिखित 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' (Mi Nathuram Godsech Boltoy) या नाट्यप्रयोग दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर प्रेमींनी सादरीकरण आणि सावरकरांचा चुकीचा इतिहास मांडल्याचा आरोप करत, विरोध केला. यावेळी सावरकर प्रेमींनी सावरकरां सह नथुराम गोडसे जिंदाबाद अशा घोषणा देत व्यक्तय आणल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलीस दाखल : नाट्य प्रयोग अंतिम टप्यात असताना उपस्थित असलेले सावरकर प्रेमी यांनी उभा राहून घोषणाबाजी करत सावरकरांचा चुकीचा इतिहास सादर केला जात असल्याचा जाब नाट्य निर्मात्यांना विचारला. यावेळी त्यांना काही विरोध असेल तर पोलिसात तक्रार करा असे सांगण्यात आले. गोंधळ वाढत जाऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले, तसे पोलिसांनी तोफखाना नाट्यगृहात दाखल होत मध्यस्थी केली. याबाबत नाटकाला विरोध करणाऱ्यांना नाट्य संहिता, व्हिडीओ देऊन तक्रार आल्यास त्याआधारे वरिष्ठांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेऊ असे सांगण्यात आल्याचे समजते.
गोडसेच्या जिंदाबादच्या घोषणा देणे चुकीचे : याबाबत नाट्य परिषदेच्या अहमदनगर शाखेचे पदाधिकारी नाट्यकर्मी सतीश लोटके यांनी सांगितले की नाट्य संहिता सेंसार बोर्डाकडून मंजूर झालेली असताना आणि स्पर्धेत हौशी नवीन नाट्यकर्मी त्यात सहभागी असताना विरोध करणे आणि नथुराम गोडसे जिंदाबाद अशा घोषणा देणे चुकीचे आहे. काही तक्रार असल्यास पोलिसांत द्यावी उगाच सुरळीत सुरू असलेल्या नाट्य स्पर्धेस बाधा आणली जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.
स्वा.सावरकरांचा इतिहास दाखवू नये : याबाबत नादारीकरणावर आक्षेप घेणारे सावरकर प्रेमी उत्कर्ष गीते यांनी सांगितले की, नाटकात स्वातंत्रवीर सावरकरां बाबत चुकीची माहिती जाईल असे सादरीकरण करत चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप केला. तसेच प्रयोगापूर्वी निर्मात्यांनी नाटकाचा इतिहासाशी काही संबंध नाही, असे जाहीर करायला हवे होते. याबाबत उपमुख्यमंत्री नगरला आल्यानंतर त्यांच्या समोर हा विषय मांडला जाईल असे गीते यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री फडणवीस १९ तारखेला नगर मधे येत आहेत, यावेळी त्यांच्या कडे तक्रार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाची नाट्य स्पर्धा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सुरू असून; अहमदनगर केंद्रावर १५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत एकूण अठरा विविध नाटके सादर केली जाणार आहेत.