अहमदनगर - कोपरगावच्या एस. टी. आगारात काही कर्मचारी कामाच्या वेळेत जुगार खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर एस. टी. महामंडळाने कोपरगाव आगारातील पत्ते खेळणाऱ्या 6 कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे. निलंबित केलेले कर्मचारी आगारातील कार्यशाळेत काम करत होते.
२ हजार गाड्यांची माहीत व त्यांच्या लॉकसिटची चौकशी सुरू -
कोपरगाव आगारात प्रवाशी वाहतूक करण्यासाठी इतर आगाराच्या येणाऱ्या २ हजार गाड्यांची माहीत व त्यांच्या लॉकसिटची चौकशी सुरू झाली. राज्यातील इतर आगाराची सविस्तर माहीत गोळा करण्यासाठी तब्बल १ हजार ५०० कर्मचारी राज्यभर कामाला लागले आहेत. त्यामुळे कोपरगाव आगारातील पत्त्याच्या खेळाने राज्यातील २५० आगारातील किती कर्माचाऱ्यांच्या आयुष्याचा खेळ होईल हे सांगता येणार नाही.
उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकवर -
अहमदनगर जिल्ह्यात ११ आगारातमध्ये कोपरगाव आगाराचे काम अतिशय उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षभरात करोनाच्या महासंकटात कोपरगाव आगार उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकवर आहे. मालवाहतुक सेवेतही अग्रभागी आहे. मात्र,ही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे कोपरगाव आगाराचे नाव राज्यात बदनाम झाले. दरम्यान एस. टी. महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, जुगार खेळण्याच्या या प्रकरणात आता गव्हाबरोबर किडेही रगडले जाणार आहेत.
अनेक आगारातील कर्मचारी विविध प्रकरणात दोषी आढळण्याची शक्यता?
वर्षभराच्या चौकशीत अनेक आगारातील कर्मचारी विविध प्रकरणात दोषी आढळण्याची शक्यता दाट आहे. काम नसले की विरंगुळा म्हणून पत्ते खेण्याची सवय राज्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना आहे. परंतु आता या प्रकरणाने कर्मचाऱ्याबरोबर राज्यातील काही अधिकाऱ्यांचे कारनामे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई -
साहित्य खरेदी असो किंवा अन्य आर्थिक व्यवहार, देखभाल दुरुस्तीच्या कामाची एस. टी. महामंडळ सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याने या प्रकरणात कधी कोणाचा बळी जाईल हे येणार काळ ठरवेल. राज्यातील संपूर्ण एसटी महामंडळ कोपरगाव जुगार प्रकरणाने खडबडून जागे झाले