ETV Bharat / state

चालकाला चक्कर आल्याने एसटी राहुरीच्या पेट्रोल पंपाजवळ पलटली, १० ते १२ प्रवाशी जखमी

author img

By

Published : Apr 4, 2021, 2:08 AM IST

राज्य परिवहन महामंडळाची श्रीरामपूर-अहमदनगर एसटी बस राहुरीच्या पेट्रोल पंपाजवळ अचानक पलटी झाली. या अपघातात अंदाजे 10 ते 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

ST bus overturned on Shrirampur-Ahmednagar road
चालकाला चक्कर आल्याने एसटी राहुरीच्या पेट्रोल पंपाजवळ पलटली, १० ते १२ प्रवाशी जखमी

अहमदनगर - राज्य परिवहन महामंडळाची श्रीरामपूर-अहमदनगर एसटी बस राहुरीच्या पेट्रोल पंपाजवळ अचानक पलटी झाली. या अपघातात अंदाजे 10 ते 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बस चालकाला अचानक चक्कर आल्याने सदरची घटना घडल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.

चालकाला चक्कर आल्याने एसटी राहुरीच्या पेट्रोल पंपाजवळ पलटली

याबाबत माहिती अशी की, श्रीरामपूरकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या एसटी बसच्या, चालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटले आणि बस राहुरी जवळील भुजडी पेट्रोल पंप जवळील ओढ्यात पलटली. तेव्हा या बसमधील दहा ते बारा प्रवाशांना उपस्थित नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सर्व जखमी प्रवाशांवर राहुरीच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

बस पलटी झाल्यानंतर क्रेनच्या साह्याने बसला ओढ्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे राहुरी फॅक्टरीकडून येणारी सर्व वाहतूक यावेळी ठप्प झाली होती. राहुरी पोलीस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक शेळके, पोलीस नाइक खरात, कर्मचारी आदिनाथ पाखरे तसेच बनसोडे व इतर सहकार्‍यांनी तसेच माजी नगरसेवक नितीन तनपुरे, राजू गुंजाळ, विजय मुथा, राजू तनपुरे, सचिन भुजडी, अजिंक्य भुजडी, महेश वराळे आदींनी जखमींना बाहेर काढले.

हेही वाचा - नगरविकास मंत्र्यांची भेट म्हणजे धूळफेक, शिवसेनेची भाजपावर टीका

हेही वाचा - जिल्ह्यात कोरोनाची स्थिती भयावह; नागरिक बेफिकीर तर पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.