ETV Bharat / state

Sonu Sood In Shirdi : सोनू सूदने सुरु केले शिर्डीत उसाच्या रसाचे दुकान

नेहमी आपल्या वेगळ्यावेगळ्या भुमिकेमुळे चर्चेत राहणारा अभिनेता सोनू सूद शिर्डी दौऱ्यावर होता. आज ( 5 मे ) शिर्डीहून अंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जातांना सोनू सूद एक रसाचे दुकान चालवत ( Sonu Sood Offering Sugar Cane Juice ) आहे.

Sonu Sood
Sonu Sood
author img

By

Published : May 5, 2022, 5:54 PM IST

शिर्डी - नेहमी आपल्या वेगळ्यावेगळ्या भुमिकेमुळे चर्चेत राहणारा अभिनेता सोनू सूद शिर्डी दौऱ्यावर होता. आज ( 5 मे ) शिर्डीहून अंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जातांना सोनू सूद एक रसाचे दुकान चालवताना दिसला आहे. एवढेच नाही तर स्वत: आपल्या हाताने रस काढून मित्रांना दिल्याचा व्हिडिओ सोनू सूदने ट्विट केला ( Sonu Sood Offering Sugar Cane Juice ) आहे.

शिर्डीहून काकडी येथे विमानतळावर जातांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईकृष्णा या दुकानावर सोनू सूद थांबला होता. या दुकानात अनेक वस्तु मिळतात तसेच दुकानाच्या बाहेर एका बाजुला चहा तर दुसऱ्या बाजुला रसवंतीही आहे. सोनू सूदने दुकानातुन बाहेर येत त्याच्याबरोबर असलेल्या कोपरगावातील विनोद राक्षे आणि शिर्डीतील आरीफ भाईंना काय पाहिजे विचारले असता त्यांनी रसाची मागणी केली.

सोनू सूदने सुरु केले शिर्डीत उसाच्या रसाचे दुकान

त्यानंतर सोनू फटाफट रस तयार करा, असे दुकानातील साथिदारांना सांगतो. तसेच, रसाचे मशिन सुरु करण्यास सांगितले. त्याचसोबत राक्षे आणि आरीफ हे सोनूची शिर्डीत आल्यानंतर दर्शनाची व्यवस्था करता. त्यामुळे सानूने आपल्या हाताने त्यांना ऊसाचा रस काढून दिला आहे.

हेही वाचा - Bhima koregaon Case : उद्धव ठाकरे, फडणवीस, आंबेडकर, आठवलेंना जबाबाला बोलवावे का?, आयोगाचा शरद पवारांना प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.