ETV Bharat / state

राम मंदिर भूमीपूजनासाठी शिर्डीतून साई तीर्थ, विभूती अन् मंदिरातील माती आयोध्येला रवाना - sai temple news

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी शिर्डी येथील साईबाबांचे तीर्थ, मंदीरातील विभूती व माती पाठविण्यासाठी आज (दि. 26 जुलै) आज पोस्टाने रवाना केली आहे.

shirdi
shirdi
author img

By

Published : Jul 26, 2020, 3:10 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीतील माती, साई तीर्थ तसेच साईबाबांची विभूती श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पाठविण्यात आली आहे. शिर्डीतील विश्व हिंदू परिषेद व बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टाद्वारे या वस्तु पाठवल्या.

आयोध्येत राम मंदिर उभारण्यात येत असल्याने येत्या 5 ऑगस्टला मंदिराच्या भूमीपूजनासाठी देशभरातील धार्मिक तीर्थक्षेत्रातील माती आणि तीर्थ विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मागवले जात आहे. यामुळे शिर्डीतील विश्व हिंद परिषदेचे कार्यकर्ते व बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी आज साई मंदिराच्या चार नंबर गेट क्रमांक चार समोर श्री रामाच्या प्रतिमेची व साईबाबांचे तिर्थ तसेच विभूतीची पूजा केली. त्यानंतर विभूती राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी माती व साई तीर्थ पोस्टाने पाठविण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे राहता तालुका अध्यक्ष सुरेंद्र महाले यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.