ETV Bharat / state

नळपाणी योजनेचे पाणी वाया गेल्याने सामाजिक कार्यकर्त्यांची नगरपालिकेसमोरच अंघोळ

श्रीगोंदा शहरवासियांची तहान भागविण्यासाठी नळपाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

नगरपालिकेसमोरच अंघोळ करताना दत्तात्रय जगताप
author img

By

Published : May 28, 2019, 1:52 PM IST

Updated : May 28, 2019, 3:22 PM IST

अहमदनगर - बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून श्रीगोंदा शहरवासियांसाठी नळपाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगताप यांनी श्रीगोंदा पालिका कार्यालयासमोर अंघोळ करून पालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.

नळपाणी योजनेची माहिती सांगताना उपनगराध्यक्ष आणि दत्तात्रय जगताप

पाचपुते यांच्या प्रयत्नातून घोड धरणातून सुमारे ५० कोटी रुपये खर्च करुन श्रीगोंदा शहरवासियांची तहान भागविण्यासाठी नळपाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, या योजनेला ऐन दुष्काळात मोठी गळती लागली आहे. या पाणी पुरवठा योजनेच्या पाईपला शहरात अनेक ठिकाणी ‘एअर वॉल’ काढले नसल्याने वितरण व्यवस्थेतील पाईप लीक होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत असल्याने गेले १० दिवस पालिकेकडून पाणी न मिळाल्याचा आरोप करुन दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष जगताप यांनी पालिका कार्यालया समोरच अंघोळ करुन पालिका प्रशासनाचा निषेध केला.

शहरात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात ठिक ठिकाणी एअर वॉल बसविणे अपेक्षित असताना कसल्याही प्रकारचे नियोजन न करता शहरात पाईप टाकण्यात आल्या. तसेच पाण्याचा नेमका दाब किती, हे कर्मचाऱ्यांना समजत नाही. यामुळेच पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप पाणी सुटले की फुटत असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे शुध्दीकरण करण्यात आले आहे. शुध्द केलेले पाणी, विजेचा वापर आणि दुष्काळात या पाण्याचा अपव्यय हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मात्र, तरीही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप होऊ लागला आहे.

तांत्रिक अडचणीमुळे वितरण व्यवस्थेतील काही पाईप लीक होत असले तरी त्यावर कायमस्वरुपी उपाय योजना करण्यात येणार आहे. नागरिकांनी संयमाची भूमिका घेऊन पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी केले आहे.

Intro:अहमदनगर- लाखो लिटर पाणी वाया गेल्याने पालिके समोर अंघोळ करून सामाजिक कार्यकर्त्यांचा असंतोष..  Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_water_west_protest_2019_vij1_7204297

अहमदनगर- लाखो लिटर पाणी वाया गेल्याने पालिके समोर अंघोळ करून सामाजिक कार्यकर्त्यांचा असंतोष..  

 अहमदनगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात सध्या 'गंगा आली रे अंगणी' या गाण्याची अनुभूती ऐन उन्हाळ्यात श्रीगोंदेकर नागरिक घेत आहेत. श्रीगोंदा पालिकेच्या वतीने ही कृपा होत असली तरी घरातील नळांना पाणी येत नसल्याचा निषेध म्हणून एका सामाजिक कार्यकर्त्याने चक्क पालिका कार्यालयासमोरच सवाद्य अंघोळ करून पालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे. तांत्रिक कारणामुळे वारंवार पाईपलाईनचे व्हॉल्व फुटून हजारो लिटर्स पाणी वाया जात असल्याने नागरिकांत नाराजी दिसून येत आहेत. पदाधिकारी मात्र एखादी-दुसरी घटना घडली असून आहे त्या तांत्रिक दुरुस्त्या करण्यात येत असल्याचे सांगत आहेत.

-माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून घोड धरणातून सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून श्रीगोंदा शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी करण्यात आलेल्या नळपाणी योजनेला एन दुष्काळात मोठी गळती लागली आहे. या  पाणी पुरवठा योजनेच्या पाईपला शहरात अनेक ठिकाणी ‘एअर वॉल’ काढले नसल्याने वितरण व्यवस्थेतील पाईप लीक होऊन लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप होत आहे., पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत असल्याने गेली दहा दिवस पालिकेकडून पाणी न मिळाल्याचा आरोप करून दक्ष नागरिक फाऊंडेशन चे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी चक्क श्रीगोंदा नगर पालिका कार्यालया समोरच अंघोळ करून पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.  

-श्रीगोंदा शहरात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात ठीक ठिकाणी एअर वॉल बसविणे अपेक्षित असताना कसल्याही प्रकारचे नियोजन न करता शहरात पाईप टाकण्यात आले आहेत पाण्याचा नेमका दाब किती आहे हे कर्मचाऱ्यांना समजत नसल्याने पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पाणी सुटले कि फुटत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे शुध्दीकरण करण्यात आले आहे. शुध्द केलेले पाणी, विजेचा वापर व दुष्काळात या पाण्याचा अपव्यय हा अत्यंत गंंभीर प्रकार आहे. मात्र या प्रकाराकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

-दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे वितरण व्यवस्थेतील काही पाईप लीक होत असले तरी त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात येणार असून नागरिकांनी संयमाची भूमिका घेऊन पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी केले आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर. 

Conclusion:अहमदनगर- लाखो लिटर पाणी वाया गेल्याने पालिके समोर अंघोळ करून सामाजिक कार्यकर्त्यांचा असंतोष..  
Last Updated : May 28, 2019, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.