ETV Bharat / state

अजब शक्कल.. रुग्णवाहिकेतून देशी दारूची तस्करी; दोन आरोपीसह दारू, रुग्णवाहिका जप्त - रुग्णवाहिकेतून देशी दारूची तस्करी

रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 23 हजार 500 रुपयाच्या देशी दारूसह रुग्णवाहिका जप्त केली आहे.

Smuggling of  liquor
Smuggling of liquor
author img

By

Published : Apr 24, 2021, 3:16 PM IST

Updated : Apr 24, 2021, 3:24 PM IST

अहमदनगर - रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 23 हजार 500 रुपयाच्या देशी दारूसह रुग्णवाहिका जप्त केली आहे.

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. दारूची दुकाने बंद असतानाही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री केली जात आहे. दोघा युवकांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता संगमनेर शहरातीलच एका दारूच्या दुकानातून ही दारू त्यांनी घेतली. संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे देशी दारू नेण्यात येणार होती.

रुग्णवाहिकेतून देशी दारूची तस्करी
सायरन वाजवत शहरातून रुग्णवाहिका घेऊन जात होते. संगमनेर बस स्थानक परिसरात बंदोबस्तासाठी उभ्या असणार्‍या पोलिसांनी या रुग्णवाहिकेचा संशय आला. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व काही पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडवून आतमध्ये पाहणी केली. या रुग्णवाहिकेत देशी दारूचे सात बॉक्स ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कैलास छबू नागरे (रा. शेडगाव), विजय खंडू फड (रा. मालदाड रोड, संगमनेर) या दोघांना ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेसह त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सचिन उगले यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता 188, 269, 65 (अ), महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई, सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार फटांगरे करीत आहेत.

Last Updated : Apr 24, 2021, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.