ETV Bharat / state

सहा देशातील भाविक झाले साईचरणी नतमस्तक; पाहा व्हिडिओ - Saibaba Temple In Shirdi

Shirdi Saibaba Temple : सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांना देशातील नव्हेतर परदेशातील श्रद्धाळू भाविक देखील आपला देव मानतात. आज तब्बल 6 देशातील 52 भाविकांनी एकाच वेळी साईदरबारी येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. तसंच साईबाबांच्या दुपारच्या माध्यन्ह आरतीलाही हजेरी लावलीय.

Shirdi Saibaba Temple
शिर्डी साईबाबा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 4:14 PM IST

Updated : Nov 20, 2023, 5:44 PM IST

प्रतिक्रिया देताना तुकाराम हुलवळे

अहमदनगर (शिर्डी) Shirdi Saibaba Temple : साईबाबांची महती साता समुद्रापार पोहोचली आहे. मागील काही वर्षात विदेशी साईभक्तांची गर्दी ही शिर्डीत वाढताना दिसत आहे. विदेशातही साईबाबांची मंदिरे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली आहेत. आज साईदरबारी जर्मनी, स्वित्झर्लंड,ऑस्‍ट्रिया, रशिया आणि डेन्‍मार्क या सहा देशांतील 37 महिला आणि 15 पुरुष असे एकूण 52 विदेशी भविक आले होते. यावेळी भाविकांनी साईबाबांच्या माध्यन्ह आरतीला हजेरी लावत साई समाधीचं (Sai Baba Samadhi) दर्शन घेतलंय.

विदेशी भाविकांचा केला सन्मान : साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी या 52 विदेशी भाविकांचा साईबाबांची उदी, बुंदी प्रसाद, श्रद्धा सबुरी नाव असलेल्या शाल देवून सन्मान केलाय. या विदेशी भाविकांनी साईमंदिर परिसरात टाळ्यांच्या गजरात 'ओमसाई श्रीसाई' 'जय जय साई' मंत्रानी जयजयकार केला.

विदेशी भक्तांनी दिलं दान : भाविकांना भाषेची मर्यादा नसते. देशांच्या सीमा भाविकांना आडव्या येत नाहीत. म्हणून वर्षभर शिर्डीला विदेशी भाविकांचा ओघ सुरुच असतो. आज विदेशात साईबाबांची 1000 च्यावर मंदीरे निर्माण झाली आहेत. आज देखील शिर्डीत विदेशी भक्त दर्शनाला येतात. मात्र ड्रेसकोडच बंधन हे विदेशी भाविक आवर्जुन पाळतात. साई दरबारात जशी विदेशी भाविकांची मांदियाळी वाढत आहे, तशी विदेशी दानातही वाढ झाल्याचं वेळोवेळी दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात साई संस्थानला कोट्यवधी रुपयांचं दान विदेशी भक्तांनी दिलं आहे. साईबाबांवरील जीवनचरित्र विविध भाषेत उपलब्ध असल्यानं बाबांचे आचार-विचार काय आहेत, त्याची प्रचिती भाविकांना येत आहे. त्यामुळंच बाबांवरील श्रद्धा व्यक्त करताना विदेशी साईभक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता.

हेही वाचा -

  1. Diwali Festival 2023: दिवाळीच्या सुट्ट्या, शिर्डीत भाविकांची दर्शनासाठी गर्दी; पाहा व्हिडिओ
  2. Janmashtami २०२३ : साईबाबा मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव; चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून कीर्तन सोहळा
  3. Gold Donation To Saibaba : साईमंदिराचा कलश आतूनही सुवर्णमय, हैदराबादच्या साईभक्तानं पुन्हा दिलंय भरीव सुवर्णदान

Last Updated : Nov 20, 2023, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.