अहमदनगर - देशात संचारबंदी सुरू आहे. महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुट देण्यात आली आहे. पण, ग्राहकांनी गर्दी करू नये, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजारात व किराणा दुकानाबाहेर गर्दी होऊ नये, तसेच दोन ग्राहकांमध्ये दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षित अंतर राखता यावे यासाठी दुकानदारांनी व भाजीविक्रेत्यांनी स्वयंशिस्तीने आखणी केली आहे.
जिल्ह्यातील शिर्डी जवळील एखरुखे, कोपरगाव येथील किराणा, भाजीविक्रेत्यांनी त्यांच्या दुकानाबाहेर एक मिटरच्या अंतरावर आखणी करत ग्राहकांना त्या आखलेल्या जागी उभे राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ग्राहकही सुरक्षित अंतर ठेवून रांगेत उभे आहेत. तसेच काही किराणा दुकानदारांनी जर जास्तीचे सामान हवे असल्यास सकाळीच व्हाट्सअॅपवर यादी पाठविण्यास सांगितली आहे. तो माल दुपारी 12 ते 3 या वेळेत घेऊन जान्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृदा जलसंधारणा मंत्री गडाखांचा मोठा निर्णय...