ETV Bharat / state

'शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना शेतकरी आत्महत्या सत्रास सुरुवात' - अहमदनगर बातम्या

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी घेतलेल्या सभेत, युती सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, 16 हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी टीका केली होती. या टीकेला बुधवारी उद्धव ठाकरेंनी याच व्यासपीठावरून उत्तर देत शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना सुरू झाल्याचे सांगितले.

uddhav thackeray on sharad pawar
author img

By

Published : Oct 10, 2019, 10:05 AM IST

अहमदनगर - शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना सुरू झाल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांच्या नगर जिल्ह्यात झंझावाती चार सभांचे आयोजन करण्यात आले होते. पारनेर येथे या मतदारसंघात तीन वेळेस आमदार राहिलेले पक्षाचे उमेदवार आणि विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

हेही वाचा - ते थोरात तर आम्ही जोरात - उध्दव ठाकरे

मंगळवारी याच मैदानावर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी घेतलेल्या सभेत, युती सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, 16 हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी टीका केली होती. या टीकेला बुधवारी उद्धव ठाकरेंनी याच व्यासपीठावरून उत्तर देत शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना सुरू झाल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर टीका

हेही वाचा - येत्या 5 वर्षात सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू - उद्धव ठाकरे

आघाडी सरकारने त्यावेळी घेतलेल्या शेतकरी कर्जमाफी मागे शिवसेनेने त्यावेळी सरकारच्या विरोधात केलेली तीव्र आंदोलने कारणीभूत असल्याचा दावा केला. तसेच पीकविम्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानेच यंदा दहा लाख शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाल्याचे स्पष्ट केले. या सभेत पारनेरच्या नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतीलही, पण आमदार निवडून येणार तरी किती?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही आता थकल्याचे कारण देत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा मुद्दा पुढे केला. यावर ठाकरे यांनी भाषणात हे दोन पक्ष एकत्र येतीलही, पण यांचे आमदार आता दहा तरी निवडून येणार का? असा प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवली.

Intro:अहमदनगर- शरद पवार केन्द्रात कृषी मंत्री असताना शेतकरी आत्महत्या सत्रास सुरुवात -उद्धव ठाकरे यांची टीकाBody:अहमदनग- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_parner_thakare_rally_vij_7204297

अहमदनगर- शरद पवार केन्द्रात कृषी मंत्री असताना शेतकरी आत्महत्या सत्रास सुरुवात -उद्धव ठाकरे यांची टीका

अहमदनगर- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे
यांच्या आज नगर जिल्ह्यात झंझावाती चार सभांचे आयोजन करण्यात आले होते. पारनेर इथे या मतदारसंघात तीन वेळेस आमदार राहिलेले पक्षाचे उमेदवार आणि विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलेच निशाण्यावर घेतले. काल याच मैदानावर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारा साठी घेतलेल्या सभेत युती सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, 16 हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशी टीका केली होती. या टीकेला आज उद्धव यांनी याच व्यासपीठावरून उत्तर देत शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना सुरू झाल्याचे सांगितले. आघाडी सरकारने त्यावेळी घेतलेल्या शेतकरी कर्जमाफी मागे शिवसेनेने त्यावेळी सरकारच्या विरोधात केलेली तीव्र आंदोलने असल्याचा दावा केला. तसेच पिकविम्या बाबत आक्रमक भूमिका घेतल्यानेच यंदा दहा लाख शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाल्याचे स्पष्ट केले.
आज झालेल्या सभेत पारनेरच्या नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतीलही,पण आमदार निवडून येणार तरी किती??
-काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही आता थकल्याचे कारण देत काँग्रेस-राष्ट्रवादी च्या एकत्रिकरनाचा मुद्दा पुढे केलाय, यावर ठाकरे यांनी भाषणात हे दोन पक्ष एकत्र येतीलही, पण यांचे आमदार आता दहा तरी निवडून येणार का असा प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.
Conclusion:अहमदनगर- शरद पवार केन्द्रात कृषी मंत्री असताना शेतकरी आत्महत्या सत्रास सुरुवात -उद्धव ठाकरे यांची टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.