ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये कंगनाचा एकही चित्रपट यापुढे प्रदर्शित होऊ देणार नाही, सेनेचा इशारा

अभिनेत्री कंगना रणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे. अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी कंगना रणौतच्या पोस्टरला जोडे मारत पोस्टर जाळला आहे.

जोडे मारताना शिवसैनिक
जोडे मारताना शिवसैनिक
author img

By

Published : Sep 10, 2020, 3:42 PM IST

अहमदनगर- शहर शिवसेनेच्यावतीने आज (गुरुवार) चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कंगनाच्या पोस्टरला जोडे मारुन ते जाळण्यात आले. कंगनाने महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतलेली असून आमच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. महाराष्ट्र तिला कदापी माफ करणार नाही. तिचा आगामी कोणताही चित्रपट नगर शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिला.

बोलताना शिवसेना शहर प्रमुख

शहरातील दिल्लीगेट येथे झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कंगना रणौत हिच्या मनिकर्णिका या कार्यालयाच्या अवैध बांधकामावर काल (9 सप्टें.) मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली होती. त्यावरुन कंगनाने एका व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. यामुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाचील लाट उसळली आहे.

शिवसेनेत दोन गट
कालच (बुधवार) माजी शिवसेना शहर प्रमुख आणि माजी महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम यांनीही काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना सोबत घेत कोतवाली पोलीस ठाण्यात अर्ज देत कंगना रणौत विरोधात कारवाईची मागणी करणारे पत्र दिले होते. त्यानंतर आज विद्यमान शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखाली जोडेमारो आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनात परस्पर विरोधी पदाधिकरी उपस्थित नव्हते. यावरुन शिवसेनेने एकाच मुद्यावर दोन वेगवेगळे आंदोलन केल्याचे समोर आल्याने शहर शिवसेनेतील दुफळी समोर येत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - नगर शहरासह जिल्ह्यात सायंकाळी पावसाची जोरदार बॅटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.