ETV Bharat / state

नळपट्टी, घरपट्टी अशा अनेक मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थांचा नगरपंचायतीवर आक्रोश मोर्चा - शिर्डी ग्रामस्थ आक्रोश मोर्चा

कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शिर्डी शहरातील दुकानधारक, मालमत्ताधारक यांचे थकित गाळेभाडे, तसेच नळपट्टी, घरपट्टी संदर्भातील शिर्डी नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने पठाणी वसुली थांबवून करमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने शिर्डी ग्रामस्थांनी नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावर महाआक्रोश मोर्चा धडकवून नगरपंचायत प्रशासन व राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

Shirdi villagers protest over taxes
शिर्डी ग्रामस्थ आक्रोश मोर्चा
author img

By

Published : Feb 26, 2022, 5:00 PM IST

अहमदनगर - कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शिर्डी शहरातील दुकानधारक, मालमत्ताधारक यांचे थकित गाळेभाडे, तसेच नळपट्टी, घरपट्टी संदर्भातील शिर्डी नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने पठाणी वसुली थांबवून करमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने शिर्डी ग्रामस्थांनी नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावर महाआक्रोश मोर्चा धडकवून नगरपंचायत प्रशासन व राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

माहिती देताना शिर्डी नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष

हेही वाचा - Bus Burning In Shirdi : तेलंगणाची बस शिर्डीत जळून खाक; 50 लाखांचे नुकसान झाल्याची शक्यता

कोरोना काळात लॉकडाऊन तसेच, साई मंदिर बंद असल्याने शिर्डी शहरातील छोटे - मोठे व्यावसायिक आर्थिक संकटाच्या खाईत सापडले आहेत. शहरातील व्यावसायिक, नागरिकांना कर माफी, गाळेभाडे माफीसाठी नगरपंचायत प्रशासनाने सरकार व नागरिकांची दिशाभूल करणे थांबवावे, यापूर्वी शिर्डी नगरपंचायतीच्या सभागृहात एकमताने घेतलेल्या निर्णयाचे व यासंबंधी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून तातडीने करमाफी व गाळे भाडे माफी द्यावी, यासाठी शिर्डीतील हजारो ग्रामस्थांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारकामाईपासून महाआक्रोश मोर्चाला सुरुवात केली. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या तसेच, नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. या मोर्चात पोतराजांनी आपले पारंपारिक वाद्य वाजवून तसेच, अंगावर चाबकाचे फटके ओढत नगरपंचायत प्रशासन व राज्य सरकारचा निषेध केला.

दरम्यान नगरपंचायतच्या वतीने सुरू असलेली पठाणी वसुली बंद करा, नळ कनेक्शन तोडणे बंद करा, गाळेभाडे माफ करा, घरपट्टी, नळपट्टी माफ करा, साई संस्थानकडून लाखोंचा निधी मिळतो तरी पंचायत आमच्याकडून करवसुली करते, अशाप्रकारचे फलक मोर्चात दिसून आले. यावेळी भाजपचे राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कैलास कोते, विजय कोते, अशोक गोंदकर, रवींद्र गोंदकर, अ‍ॅड. अनिल शेजवळ, हरिश्चंद्र कोते, सुजीत गोंदकर, सचिन शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा - Russia Ukraine Crisis : युक्रेनमध्ये अडकले पुणे, नाशिकसह अहमदनगरचे 18 विद्यार्थ्यी; जिल्हा प्रशासन सक्रीय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.