अहमदनगर : शिर्डी साईबाबा मंदिराला सीआयएसएफ सुरक्षा व्यवस्थेला ग्रामस्थ विरोधक करत आहेत. पाच मागण्या घेवून शिर्डी ग्रामस्थ गेल्या काही दिवसांपासुन आंदोलन तसेच विविध मार्गाने निषेध करताना पाहायला मिळत आहे. शिर्डी ग्रामस्थांनी 1 मे रोजी शिर्डीशहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला होते. मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली होती. या बैठकीत शिर्डी बेमुदत बंद आंदोलन मागे घेण्यात आले. आता पुन्हा आपल्या याच 5 मागण्या घेवुन शिर्डी ग्रामस्थानी शिर्डीतील दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर 3 मे रोजी सायंकाळी ग्रामसभा घेतली. यात एकमुखाने ठराव करत आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे यावेळी शिर्डी नगरपंचायतचे प्रथम माजी नगराध्यक्ष कैलासबापु कोते यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटणार शिष्टमंडळ : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिर्डी ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ भेटणार आहे. आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचेही यावेळी भाजप नेते आणि साई संस्थानचे माजी विश्वस्त शिवजी गोंदकर यांनी सांगितले आहे. साईबाबा मंदिराच्या सुरक्षेतेसाठी सीआयएसएफ सुरक्षा नेमण्यात आली, तर महिन्याला 1 कोटी रूपयांचावर सीआयएसएफ कर्मचार्यांच्या पगारावर साईबाबा संस्थानला खर्च करावा लागणार आहे. महिन्याला कोटी रूपयांचा खर्च सीआयएसएफवर करण्याऐवजी साई संस्थानकडे असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. आहे तीच, सुरक्षा अजून कडेकोट करण्यात यावी. भाविकानाकडून येणाऱ्या दानावर साई संस्थान सुरु आहे. त्यामुळे भाविक देत असलेल्या दानाचा वापर भाविकांचा सुविधेसाठी व्हावा. शिर्डीतील थांबलेल्या विकासाला गती देण्याचा प्रत्यन करायला हवा, असेही यावेळी ग्रामस्थ अभय शेळके म्हणाले आहे.
'हीच' सुरक्षा साई मंदिराला भक्कम : शिर्डी साईबाबा मंदिराला सीआयएसएफ सुरक्षा एण्याच्या मार्गावर असल्याने साईबाबा संस्थानला सीआयएसएफ सुरक्षाची काहीच गरज नाही. सध्या साईबाबा मंदिराची तसेच मंदिर परिसराची सुरक्षा साई संस्थानचे 835 सुरक्षा कर्मचारी सुरक्षा पाहत आहे. त्याचबरोबर साईबाबा मंदिरात भाविकांना येण्याजाण्यासाठी असलेल्या 5 मुख्य गेटची सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांचे 70 कर्मचारी पाहत आहे. तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपीच्या सुरक्षासाठी 8 क्यूआरटी जवानी तैनात असल्याने सीआयएसएफ सुरक्षाची मंदिराला गरज नसल्याचे यावेळी ग्रामस्थ म्हणाले आहे.
दलालांची धुलाई करणार : साई मंदिरात झटपट दर्शन करुन देणाऱ्या दलालांची देखील यापुढे धुलाई करणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामसभेतून ग्रामस्थांनी दिला आहे. झटपट साई दर्शनाच्या नावाखाली हे दलाल भाविकांकडून मोठी माया घेवून त्यांना लुबाडत आहेत. वेळप्रसंगी त्यांना वेठीस धरतात ,अशा दलालांना चोप देवून पोलिसांच्या स्वाधिन केले जाणार असल्याचाही इशारा शिर्डी ग्रामस्थ नितिन उत्तम कोते यांनी दिला आहे.
'या' आहे ग्रामस्थांच्या मागण्या : साईबाबा मंदीराला सीआयएसएफ सुरक्षा व्यवस्था नको, सध्या असलेली सुरक्षा योग्य आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद आयएएसा अधिकारीकडे नको, उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकारी यांच्याकडे हे पद असावे. साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेल्या तदर्थ समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला आहे. सर्व निर्णय प्रलंबित आहे. तर यावर राज्य शासनाने नियुक्त समिती नेमावी. शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमणूक करण्यात यावे. यात शिर्डीतील 50 टक्के विश्वस्त नेमणूक करावेत. तथाकथित समाजसेवकांनी उठसूट याचिका दाखल करून साई संस्थान व शहराचा विकास ठप्प केला.